World Cup : रोहितची 64 वर्षापूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी, 8 देशही करू शकले नाही 'ही' कामगिरी

World Cup : रोहितची 64 वर्षापूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी, 8 देशही करू शकले नाही 'ही' कामगिरी

ICC Cricket World Cup : भारताचा सलामीवीर रोहित शर्माने लंकेविरुद्ध शतक करून एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम केला आहे.

  • Share this:

हेडिंग्ले, 06 जुलै : ICC Cricket World Cup मध्ये आपल्या तडाखेबाज फलंदाजीने रोहितने लागोपाठ अनेक विक्रम मोडले आहेत. त्यानं शेवटच्या साखळी सामन्यात शतक करून एकदिवसीय कारकिर्दीतील 27 वे शतक तर वर्ल्ड कप कारकिर्दीतील सहावं शतक केलं. एकाच वर्ल्ड कपमध्ये 5 शतकं करण्याचा विश्वविक्रम त्याच्या नावावर झाला आहे. लंकेविरुद्ध शतक करताना रोहितने अनेक दिग्गजांना मागे टाकलं.

वर्ल्ड कप 2019 मध्ये ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान या देशांना रोहितनं मागे टाकलं. त्याने या देशांनी केलेल्या शतकांपेक्षा जास्त शतकं केली आहेत. आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाकडून 4, बांगालादेशकडून 3 तर न्यूझीलंड, पाकिस्तान, लंका, विंडीजकडून प्रत्येकी 2 तर दक्षिण आफ्रिकेकडून एक शतक झालं आहे.

क्रिकेटच्या 142 वर्षांच्या इतिहासात कोणत्याही एका फलंदाजाने एका मालिकेत किंवा स्पर्धेत 5 शतक करणारा रोहित दुसरा फलंदाज आहे. रोहित शर्माने 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये 5 शतके केली आहेत. याआधी वेस्ट इंडिजच्या क्लाइड वॉलकॉट यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1955 मध्ये अशी कामगिरी केली होती.

रोहितने गेल्या वर्षभरात 34 डावात 10 शतकं केली आहेत. यासह त्याने 2 हजार 63 धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाने एका वर्षात 10 शतके केलेली नाहीत.

रोहितने गेल्या तीन वर्षात खेळात जबरदस्त बदल केला आहेत. आकडेवारीनुसार 2017 च्या आधी 147 डावात फक्त 10 शतकं केली होती. तर 2017 नंतर 61 डावात 17 शतकं केली आहेत. गेल्या तीन वर्षांमध्ये शतके करण्यात रोहित सर्वात पुढे आहे.

VIDEO: धोनीला पाहायचंय? या ठाण्याच्या मॉलमध्ये!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 6, 2019 10:52 PM IST

ताज्या बातम्या