विराट कोहली नाही आता रोहित झालाय 'रनमशिन', हा घ्या पुरावा!

विराट कोहली नाही आता रोहित झालाय 'रनमशिन', हा घ्या पुरावा!

ICC Cricket World Cup : गेल्या पाच वर्षांत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची समान शतके झाली असली तर गेल्या वर्षभरात रोहितने बाजी मारली आहे.

  • Share this:

लंडन, 04 जुलै : ICC Cricket World Cup मध्ये भारताचा सलामीवीर रोहित शर्माने जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतकं ठोकली आहेत. त्याचा फॉर्म पाहता एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रमही तो नावावर करण्याची शक्यता आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीसुद्धा फॉर्ममध्ये आहे. मात्र शतकापासून दूर राहिला आहे. वर्ल्ड कपमध्ये सलग अर्धशतके करण्याचा विक्रम त्यानं केला आहे.

गेल्या दोन वर्षात रोहित शर्माने शतके करण्याच्या बाबतीत कर्णधार विराट कोहलीला मागे टाकलं आहे. एक दिवसीय क्रिकेटमध्ये गेल्या पाच वर्षांपासून दोघांच्या शतकांमध्ये एक दोन शतकांचा फरक आहे. मात्र, गेल्या वर्षभरात रोहित शर्माने विराटपेक्षा 3 शतकं जास्त केली आहेत.

विराटने गेल्या वर्षभरात 6 तर रोहितने 9 शतकं केली आहेत. त्यांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता गेल्या पाच वर्षांत दोघांनीही एकूण 22 शतकं केली आहेत.

वर्ल्ड कपमध्ये भारताकडून करण्यात आलेल्या शेवटच्या सहा शतकात रोहित शर्माच आघाडीवर आहे. रोहितनं 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये रोहितनं बांगलादेशविरुद्ध शतक केलं होतं. तर 2019 च्या स्पर्धेत आतापर्यंत 4 शतकं केली आहेत. शिखर धवनने एक शतक केलं आहे.

वर्ल्ड कपमध्ये शतक करण्यात रोहितनं विराटला मागे टाकलं आहे. रोहितने 4 शतकं केली आहेत तर विराट सलग अर्धशतकं केली. विराट अर्धशतकाला शतकात रुपांतरीत करू शकलेला नाही. रोहितने आतापर्यंत 7 सामन्यात 90 च्या सरासरीने 544 धावा केल्या आहेत. तर विराटने 58 च्या सरासरीनं 408 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांच्या बाबतीत मात्र रोहित खूपच मागे आहे. विराटच्या नावावर 41 शतकं आहेत तर रोहितच्या नावावर 26 शतकं आहेत.

World Cup: सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानला करावा लागेल हा चमत्कार!

मोठी बातमी, वर्ल्ड कपमधील शेवटच्या सामन्यात धोनी करणार क्रिकेटला अलविदा?

SPECIAL REPORT: यशस्वी कॅप्टन कूल धोनी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार?

First published: July 4, 2019, 6:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading