World Cup : रिषभ पंत अफगाणिस्तानविरुद्ध खेळण्याची शक्यता, विजय शंकरला विश्रांती?

ICC Cricket World Cup : भारताचा अष्टपैलू विजय शंकरला झालेली दुखापत गंभीर नसली तरी त्याला अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 21, 2019 07:04 PM IST

World Cup : रिषभ पंत अफगाणिस्तानविरुद्ध खेळण्याची शक्यता, विजय शंकरला विश्रांती?

लंडन, 21 जून : ICC Cricket World Cup स्पर्धेत भारतीय खेळाडूंना दुखापतीला सामोरं जावं लागत आहे. सलामीवीर शिखर धवनला दुखापतीनं संघातून बाहेर पडावं लागलं. त्याच्या जागी रिषभ पंतला संघात स्थान मिळालं आहे. पंधरा जणांच्या संघात समावेश झाल्यानंतर आता त्याला अंतिम 11 मध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.

भारताचा शनिवारी अफगाणिस्तानविरुद्ध सामना होणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी अष्टपैलू खेळाडू विजय शंकरला सरावावेळी पायाला दुखापत झाली. त्याची दुखापत गंभीर नसली तरी खबरदारी म्हणून त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. असे झाल्यास पंतला संधी मिळेल.

रिषभ पंतने नेटमध्येसुद्धा सराव केला. विजय शंकर मात्र सराव करताना दिसला नाही. त्यामुळे पंत अफगाणिस्तानविरुद्ध खेळेल अशी चर्चा सुरू आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो वर्ल्ड कप स्पर्धेत खेळू शकणार नाही हे बीसीसीआयने स्पष्ट केले होते. दरम्यान, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी रिषभ पंतला इंग्लंडमध्ये बोलवलं होतं.

वर्ल्ड कपमध्ये भारताचे आतापर्यंत चार सामने झाले आहेत. चारपैकी तीन सामन्यात भारताने विजय मिळवला असून एक सामना पावसामुळे रद्द झाला. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानला पराभूत करून भारताने ७ गुणांसह गुणतक्त्यात चौथे स्थान पटकावले आहे. भारताचे पुढचे सामने अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि इंग्लंडविरुद्ध होणार आहेत.

वाचा- विराटसाठी आनंदाची बातमी, वर्ल्ड कप गाजवणारा अष्टपैलू खेळाडू फिट

Loading...

वाचा- वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या विराटसेनेचं रुप पालटलं, PHOTO व्हायरल

वाचा- ...म्हणून पाक संघानं ऐकला नाही PM इमरान यांचा सल्ला

सानियासाठी 'रावळपिंडी एक्स्प्रेस' उतरली मैदानात, ट्रोल करणाऱ्यांना खडसावलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 21, 2019 06:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...