काबुल, 12 जुलै : ICC Cricket World Cup मध्ये सर्वात खराब कामगिरी अफगाणिस्तानच्या संघानं केली. त्यांना संपूर्ण स्पर्धेत एकही विजय मिळवता आला नाही. या पराभवानंतर त्यांनी संघात मोठा बदल करत कर्णधार गुलबदीन नैबकडून नेतृत्व काढून घेण्यात आलं आहे. वर्ल्ड कपपूर्वी असगर अफगाणकडे कर्णधारपद होते. ऐनवेळी त्याला डावलून नैबला कर्णधारपद दिल्यानं संघातील खेळाडूंचा विरोधही होता.
नैबच्या जागी आता राशिद खानची संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याला तिन्ही प्रकारातील संघाचा कर्णधार करण्यात आलं असून असगर अफगाणकडे उप कर्णधारपद देण्यात आलं आहे.
अफगाणिस्तानचा कर्णधार गुलबदीनच्या नेतृत्वाखाली त्यांना स्पर्धेत चांगली कामगिरी करता आली नाही. वर्ल्ड कपच्या सुरुवातीच्या काही सामन्यात माजी कर्णधार असगर अफगाणलासुद्धा संघातून बाहेर ठेवण्यात आलं होतं. मात्र, संघात घेतल्यानंतर त्यालाही फारशा धावा करता आल्या नाहीत. त्याने 6 सामन्यात फक्त 154 धावा केल्या.
BREAKING: Rashid Khan has been appointed Afghanistan captain across formats! Asghar Afghan is vice-captain. pic.twitter.com/yKCfChR6a4
— ICC (@ICC) July 12, 2019
गुलबदीन नैब सर्वच पातळीवर अपयशी ठरला. नैबनं 194 धावा केल्या. तर गोलंदाजी करताना फक्त 9 विकेट घेतल्या. त्याच्या खराब गोलंदाजीचा फटका पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पडला. त्यांना पाकविरुद्ध विजयाची संधी होती.
वर्ल्ड कपमध्ये एकही विजय मिळवता न आलेल्या अफगाणिस्तानचा संघ सुरूवातीपासून वादात होता. वर्ल्ड कपमध्ये यष्टीरक्षक मोहम्मद शहजादला अर्ध्यातून मायदेशी पाठवण्यात आलं. त्यावेळी तो दुखापतग्रस्त असल्याचं म्हटलं जात होतं. पण शहजादनं त्याला जबरदस्तीनं बाहेर पाठवल्याचा आरोप केला होता.
VIDEO : RSSच्या शाखेत दोन गटात तुफान हाणामारी