'World Cup मध्ये पाक विरुद्ध पाक असा होईल सामना'

ICC Cricket World Cup पाकिस्तानने सलग दोन विजय मिळवून वर्ल्ड कपमधील आव्हान जिवंत ठेवलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 28, 2019 07:45 PM IST

'World Cup मध्ये पाक विरुद्ध पाक असा होईल सामना'

लंडन, 28 जून : ICC Cricket World Cup मध्ये ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलला आपली जागा पक्की केली आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असेल्या भारत, न्यूझीलंडचेही सेमीफायनलमधील स्थान निश्चित आहे. दोन्ही संघांना फक्त एका विजयाची गरज आहे. तर चौथ्या क्रमांकासाठी मात्र चार दावेदार आहेत. सध्या इंग्लंड चौथ्या स्थानावर आहे. तर लंका, बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात चुरस असून त्यांनाही सेमीफायनल गाठण्याची संधी आहे. सर्वाधिक आशा लंकेला असून त्यांचा आजच्या सामन्यात पराभव झाला तरी त्यांना पुढच्या सामन्यात विजय मिळवून सेमीफायनल गाठता येईल. मात्र, त्यांना इतर संघांच्या जय-पराजयावर अवलंबून रहावं लागेल.

दरम्यान, पाकिस्तानने सलग दोन विजय मिळवून पुन्हा वर्ल्ड कपमध्ये कमबॅक केलं आहे. आता त्यांचे पुढचे सामने अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्याविरुद्ध आहेत. सेमीफायनल गाठण्यासाठी त्यांना उर्वरित सामन्यात विजय गरजेचा आहे. पाकिस्तानच्या संघाबद्दल ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने मोठं वक्तव्य केलं आहे.

पाँटिंग म्हणाला की, पाकिस्तान जिथं हारणार असं वाटतं तिथं जिंकतो तर जिथं पराभूत करायचं असतं तिथं हारतो. आता पाकिस्तानचा सामना विरोधी संघाबरोबर नाही तर पाक विरुद्ध पाक असाच आहे.

ऑस्ट्रेलिया आणि भारताविरुद्ध पराभवानंतर ज्या पद्धतीने त्यांनी सलग दोन विजय मिळवले त्यामुळे पुन्हा एकदा आपलं स्पर्धेतील अस्तित्व दाखवून दिलं आहे. पाकिस्तानचे पुढचे सामने अफगाणिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध होणार आहेत. यात विजय मिळवल्यास सेमीफायनलमध्ये पोहचण्याची संधी मिळू शकते.

पाकिस्तानची या वर्ल्ड कपमधील वाटचाल ही 1992 मधील कामगिरीसारखीच आहे. त्यावेळी सध्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे कर्णधार होते. त्यांच्या नेतृत्वाखाली पाकने वर्ल्ड कप जिंकला होता.

Loading...

वाचा- भारताच्या विजयाने पाकिस्तान खुश, सेमीफायनलची समीकरणे बदलली

वाचा- World Cup : विराटचं ट्रम्प कार्ड, शमी म्हणजे विजयाची हमी!

वाचा- VIDEO : पाहा पांड्याचं कूल सेलिब्रेशन, विकेट मिळताच बसून वाजवल्या टाळ्या!

फुटबॉल खेळणारा हत्ती कधी पाहिलाय का? VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 28, 2019 07:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...