World Cup : यजमान इंग्लंडवर स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की?

World Cup : यजमान इंग्लंडवर स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की?

ICC Cricekt World Cup इंग्लंडला स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारत आणि न्यूझीलंडविरुद्ध विजय आवश्यक आहे.

  • Share this:

लंडन, 25 जून : वर्ल्ड कपचा प्रबळ दावेदार समजला जाणाऱ्या इंग्लंडची रविवारी भारताशी गाठ पडणार आहे. स्पर्धेत अपराजित असलेल्या भारताविरुद्ध इंग्लंडला विजय मिळवणं कठीण जाणार आहे. त्याआधी यजमानांना लंकेपाठोपाठ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. यंदाच्या वर्ल्ड कपमधील हा त्यांचा तिसरा पराभव आहे. याआधी त्यांना पाकिस्तानविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. लंका आणि ऑस्ट्रेलियानं दिलेल्या दणक्यानंतर वर्ल्ड कपमधील पुढची वाटचाल करणं त्यांच्यासाठी आव्हानात्मक आहे.

इंग्लंडला ऑस्ट्रेलियाने 64 धावांनी नमवलं होतं. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं 285 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना यजमानांना फक्त 221 धावा करता आल्या जेसन बेहरनडॉर्फ आणि मिशेल स्टार्कच्या माऱ्यासमोर बेन स्टोक्स वगळता एकाही फलंदाजाला उभा राहता आलं नाही. याधी त्यांना श्रीलंकेनं 20 धावांनी पराभूत केलं. तेव्हा श्रीलंकेनं दिलेल्या 232 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 212 धावा करू शकला होता.

सध्या बांगलादेश पाचव्या स्थानावर असून श्रीलंका सहाव्या स्थानी आहे. इंग्लंडने अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, वेस्ट इंडिजवर विजय मिळवले आहेत.या चारही सामन्यात त्यांनी नाणेफेक जिंकली होती. पाक आणि लंकेविरुद्ध त्यांनी नाणेफेक जिंकली होती तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाणेफेकसुद्धा हारले होते.

इंग्लडचे ऑस्ट्रेलियासह तीन सामने राहिले होते. त्यात ऑस्ट्रेलियासह भारत आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे. आत एक पराभव झाल्याने वर्ल्ड कपच्या सेमिफायनलमध्ये पोहचण्याचं मोठं आव्हान असणार आहे. इंग्लंड पुढच्या दोन सामन्यात बलाढ्य संघांसोबत लढणार आहे.

इंग्लंडचा वर्ल्ड कपमधील 27 वर्षातील इतिहास बघितला तर त्यांना यावेळी सेमीफायनल गाठणं कठीण आहे. 1992 पासून त्यांना ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड यांच्याविरुद्ध एकही सामना जिंकता आलेला नाही. या तीन संघाविरुद्ध त्यांना 10 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाल्याने त्यांना पुढच्या दोन्ही सामन्यात विजय आवश्यक आहे. त्यातच दुसरीकडे पाकिस्तानने सलग सामने जिंकून सेमीफायनलच्या शर्यतीत आपणही असल्याचा दावा केला आहे. जर त्यांनी उर्वरित सामन्यात विजय मिळवला तर इंग्लंडला स्पर्धेतून बाहेर पडावं लागेल.

World Cup : शोएब अख्तरचा भारतावर गंभीर आरोप!

एका हातात जनतेचे प्रश्न दुसऱ्या हातात सिगरेट, पाहा काँग्रेस मंत्र्याचा प्रताप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2019 07:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading