World Cup: फक्त एक शतक आणि रोहित करणार 'हा' महापराक्रम! ICC Cricket World Cup 2019 | Rohit Sharma | cricket

World Cup: फक्त एक शतक आणि रोहित करणार 'हा' महापराक्रम! ICC Cricket World Cup 2019 | Rohit Sharma | cricket

रोहित शर्माने जर वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी केली तर एक मोठा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला जाणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 जून: वर्ल्ड कपमध्ये भारताचा सलामीवीर रोहित शर्मा केवळ एका सामन्यात अपयशी ठरला आहे. रोहित जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा चाहत्यांना देखील त्याच्याकडून मोठ्या खेळीचा अपेक्षा असते. वर्ल्ड कपमध्ये भारताने आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत. यापैकी एका सामन्याचा अपवाद वगळता रोहितने प्रत्येक सामन्यात धावा केल्या आहेत. रोहित फॉममध्ये असे ही भारतासाठी मोठी जमेजी बाजू आहे. अशातच उद्या वेस्ट इंडिजविरुद्ध मॅनचेस्टर येथे होणाऱ्या सामन्यात सर्वांचा नजरा रोहितवर आहेत. या सामन्यात रोहितने शतकी खेळी करावी अशी अपेक्षा आहे. रोहितने जर या सामन्यात शतकी खेळी केली तर एक मोठा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला जाणार आहे.

इंग्लंडमध्ये सर्वाधिक शतक करणाऱ्या विदेशी फलंदाजांच्या यादीवर नजर टाकल्यास हा विक्रम सध्या 4 फलंदाजांच्या नावावर आहेत. हे चार फलंदाज आहेत शिखर धवन, व्हिव्हिएन रिचर्ड्स, केन व्हिलियमसन आणि रोहित शर्मा होय. या सर्वांनी इंग्लंडमध्ये प्रत्येकी 4 शतके केली आहेत. जर वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात रोहितने शतकी खेळी केली तर इंग्लंडच्या भूमीवर सर्वाधिक शतक करणारा विदेशी फलंदाज म्हणून रोहितचे नाव अव्वल स्थानी पोहोचू शकते.

VIDEO : बेन स्टोक्सला बॅटही उचलू दिली नाही, पाहा स्टार्कचा मास्टरस्ट्रोक

अशी आहे इंग्लंडमधील रोहितची कामगिरी

इंग्लंडमध्ये रोहित शर्मा आतापर्यंत 19 सामने खेळले आहेत. या 19 सामन्यात त्याने 67.13च्या सरासरीने 1 हजार 07 धावा केल्या आहेत. यात चार शतकी खेळींची समावेश देखील आहे. सरासरीचा विचार करता इंग्लंडमध्ये सर्वाधिक शतक करणाऱ्या विदेशी फलंदाजांच्या यादीत रोहित केन व्हिल्यमसनच्या मागे आहेत. इंग्लंडमध्ये केनची सरासरी 79.20 इतकी आहे. जर रोहितने इंग्लंडमध्ये असाच फॉम कायम ठेवला तर सरासरीबाबत ते सर्वांच्या पुढे जाईल.

2019चा वर्ल्डकप...

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये रोहितने भारताकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. 5 सामन्यात रोहितने 320 धावा केल्या असून त्यात 2 शतकांचा देखील समावेश आहे. रोहितने दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध 122 धावा केल्या होत्या. तर पाकिस्तानविरुद्ध त्याने 140 धावांची खेळी केली होती. वर्ल्डकपमध्ये भारताचे आणखी बरेच सामने शिल्लक आहेत. त्यामुळे पुढील सामन्यात त्याला आणखी धावा करण्याची संधी आहे. पुढील 10 दिवसात भारतीय संघ वेस्ट इंडिज, इंग्लंड, बांगलादेश आणि श्रीलंका यांच्याविरुद्ध खेळणार आहे. गुणतक्त्यात भारत सध्या 9 गुणांसह तिसऱ्या स्थाावर आहे.

विधानसभेआधी सेना-भाजपमधील जागांचा तिढा वाढणार, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

First published: June 26, 2019, 9:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading