मँचेस्टर, 13 जुलै : भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज धोनीच्या निवृत्तीची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. तो भारतात परतल्यावर क्रिकेटला गुडबाय करेल असं म्हटलं जात आहे. तर दुसरीकडे धोनी ऑस्ट्रेलियात पुढच्या वर्षी होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळेल असंही म्हटलं जात आहे. दरम्यान, धोनी दुखापतीशी झुंज देत आहे. दुखापत असतानाही धोनी वर्ल्ड कपमध्ये खेळला. पाठदुखीने त्रस्त असलेल्या धोनीच्या उजव्या हाताच्या अंगठ्यालाही दुखापत झाली होती.
साखळी फेरीत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यानंतर धोनीचा एक फोटोही व्हायरल झाला होता. अंगठ्यातून आलेलं रक्त थूंकत असलेला धोनी नंतर पट्टी बाझून खेळला. त्यानंतरचे सामनेही धोनीने दुखापत असतानाही खेळले. आता त्याचा नवा फोटो आला असून अंगठ्याला बँडेज बांधलेलं दिसत आहे. धोनीचा अंगठा रक्त गोठल्यानं काळानिळा पडल्याचंही फोटोत दिसत आहे.
वर्ल्ड कपमधील अनेक सामन्यात धोनीला यष्टीरक्षण करताना त्रास झाल्याचं दिसलं आहे. हा त्रास अंगठ्याच्या दुखापतीमुळेच होता असं मानलं जात आहे. न्यूझीलंडविरुद्ध सेमीफायनलमध्ये त्याच्या हाताला दुखापत झाली होती. लॉकी फर्ग्यूसनचा चेंडू हातावर लागला होता. तो ड्रेसिंगरूममध्ये परत जाताना अंगठा दुखत असल्याचंही त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. सामना संपल्यानंतरसुद्धा त्यानं सर्वांशी डाव्या हातानं हस्तांदोलन केलं होतं.
@msdhoni why the left hand shake?
— Murtuza (@liveintra) July 11, 2019
All well, I hope!#INDvNZL@DHONIism @msdfansofficial #MSDhoni pic.twitter.com/1gpkqZ47o4
धोनी गेल्या तीन महिन्यापासून सलग क्रिकेट खेळत आहे. याआधी तो आयपीएलमध्ये खेळत होता तेव्हा पाठदुखीने त्रस्त होता. यामुळं त्याला काही सामन्य़ात खेळता आलं नव्हतं. वर्ल्ड कपमध्ये मात्र त्याला पाठदुखीचा तितका फटका बसला नसला तरी त्रास जाणवत होता. याच स्पर्धेत त्याला अंगठ्याला दुखापत झाली तरीही त्यानं खेळ सुरू ठेवला.
गुगल पोहोचलं तुमच्या बेडरूमपर्यंत, तुमची माहिती सुरक्षित तर आहे ना?