धोनी निवृत्ती घेणार की नाही? BCCI ने दिली पहिली प्रतिक्रिया

धोनी निवृत्ती घेणार की नाही? BCCI ने दिली पहिली प्रतिक्रिया

धोनीच्या निवृत्तीबद्दल त्यानं काही सांगितलं नसल्याचं विराटने म्हटलं होतं.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 जुलै : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची चर्चा आता जोर धरू लागली आहे. तो लवकरच निवृत्ती घेईल असं म्हटलं जात आहे. याबद्दल कर्णधार विराट कोहलीला विचारण्यात आलं होतं. मात्र, त्यानं धोनीने आपल्याला काही सांगितलं नसल्याचं म्हटलं होतं. आता धोनीच्या निवृत्तीबाबत बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सीके खन्ना आणि प्रशासकिय समितीच्या सदस्या डायना इडुल्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भारताच्या वर्ल्ड कपमधील कामगिरीचे कौतुक केलं पण सेमीफायनलच्या पराभवाला निराशाजनक म्हटलं आहे. भारताला सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 18 धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवाने भारताचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले.

धोनीच्या निवृत्तीबद्दल डायना इडुल्जी यांनी म्हटलं की, पुर्ण स्पर्धेत त्यानं जी कामगिरी केली त्याचं कौतुक आहे. त्यानं निवृत्ती कधी घ्यावी हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. याबद्दल तो आणि त्याचं शरीर सांगू शकतं. मला वाटतं की त्याचात अजून बरंच क्रिकेट शिल्लक आहे. तसेच धोनीच्या मार्गदर्शनाची युवा खेळाडूंना गरज आहे.

भारताचा डाव गडगडला असताना जडेजा आणि धोनीने तो सावरला. अखेरच्या क्षणी भारताला विजायपासून दूर रहावं लागलं. मात्र, जडेजा आणि धोनीनं केलेल्या खेळीला सलाम असंही डायना इडुल्जी यांनी म्हटलं आहे.

पंचांच्या चुकीचा भारताला फटका अन् धोनी झाला धावबाद?

न्यूझीलंडविरुद्ध भारताला 240 धावांचं आव्हान होतं. भारताची अवस्था 6 बाद 92 अशी झाली असताना धोनी आणि जडेजाने शतकी भागिदारी करून विजयाच्या आशा निर्माण केल्या. मात्र, जडेजा बाद झाल्यानंतर 49 व्या षटकात मार्टिन गुप्टीलच्या थेट फेकीवर धोनी धावबाद झाला. यानंतर भारताचा डाव 221 धावांवर संपुष्टात आला आणि यासह भारताचे वर्ल्ड कपचं स्वप्न भंगलं.

धोनीचा फोटो काढणाऱ्यालाही आवरलं नाही रडू, पाहा VIDEO

First published: July 11, 2019, 9:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading