World Cup : धोनीने एका चेंडूसाठी बदलली बॅट, हे होतं खरं कारण?

ICC Cricket World Cup 2019 : वेस्ट इंडिजविरुद्ध धोनीने एक चेंडू शिल्लक असताना बॅट बदलल्यानंतर षटकार मारला होता.

  • Share this:

भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीवर संथ खेळीवरू टीकेला सामोरं जावं लागत आहे. यातच वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात धोनीने शेवटच्या चेंडूवर बॅट बदलल्यानंतरही टीका केली गेली. मात्र, त्याच्या या बॅट बदलण्याचा उद्देश वेगळाच होता. तो दोन कंपन्यांच्या बॅट फलंदाजीसाठी वापरतो. एसजी आणि बीएएस या कंपन्यांचा समावेश आहे.

धोनी मैदानात उतरतो तेव्हा एक बॅट असते आणि शेवटच्या क्षणी वेगळी बॅट हातात असते. यामागे धोनीची उपकाराची भावना आहे. दोन वेगवेगळ्या कंपन्यांची बॅट वापरून तो आभार मानतो. याबाबत धोनीच्या व्यवस्थापकांनी मुंबई मिररमध्ये लिहलेल्या लेखात माहिती दिली आहे.

धोनीचे व्यवस्थापक अरुण पांडे म्हणतात की, धोनी मोठ्या मनाचा माणूस आहे. तो दोन वेगवेगळ्या बॅट वापरतो हे खरं आहे. पण हे पैशासाठी करत नाही. क्रिकेटच्या कारकिर्दीत वेगवेगळ्या टप्प्यात केलेल्या मदतीसाठी कंपन्यांचे आभार मानत आहे.

धोनीला सध्या पैशांची गरज नाही. त्याला सुरुवातीच्या काळात बीएएस आणि एसजीने भरपूर मदत केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी बीएएस कंपनीशी करार केला होता. त्याबद्दल धोनीच्या जीवनावर आधारित चित्रपटातही सांगण्यात आलं आहे.

आता धोनीच्या कोणत्याही कंपनीशी करार नाही. तरीही तो या कंपन्यांची बॅट वापरत आहे. गेल्या वर्षीपर्यंत त्याचा ऑस्ट्रेलियन कंपनी स्पार्टनशी करार होता. त्यांच्याशी कायदेशीर लढाई सुरू असून धोनीचे पैसे न दिल्याबद्दल खटला दाखल करण्यात आला आहे.

क्रिकेटपटू बॅटवर कंपनीचे स्टीक लावण्यासाठी वर्षाकाठी 4 ते 5 कोटी रुपये घेतात. यात शतक किंवा मॅन ऑफ द मॅच मिळाल्यावर वेगळे पैसे घेतले जातात. यात प्रत्येक प्रकारानुसार कराराची रक्कम वेगळी असते. आयपीएल, वर्ल्ड कप सारख्या स्पर्धेत मोठी रक्कम मिळते. सध्या विराट कोहलीला त्याच्या बॅटच्या स्पॉन्सरशिपसाठी वर्षाला 8 ते 9 कोटी रुपये मिळतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2019 07:47 PM IST

ताज्या बातम्या