World Cup : धोनीची कमाल, त्याच्यावर टीका करण्याआधी हे पाहाच!

World Cup : धोनीची कमाल, त्याच्यावर टीका करण्याआधी हे पाहाच!

भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीला वर्ल्ड कपमधील कामगिरीवरून टीका केली जात आहे.

  • Share this:

हेडिंग्ले, 06 जुलै : ICC Cricket World Cup स्पर्धेत भारताचा अखेरचा साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात भारताने लंकेला 264 धावांत रोखले. यामध्ये बुमराहनं 3 तर पांड्या, जडेजा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. यात 5 झेलबाद तर एक स्टंपिंग आहे. यामध्ये धोनीने यष्टीमागे 3 झेल आणि 1 यष्टीचित करून लंकेची आघाडीची फळी तंबूत धाडण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. धोनी रविवारी त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करणार आहे. या वयातही त्याची चपळता युवा खेळाडूंना प्रेरणा देणारी आहे.धोनी फक्त नाव नाही तर त्याने भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला असं सांगत आयसीसीने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये धोनीच्या मॅच विनिंग फलंदाजीचे काही क्षण दाखवण्यात आले आहेत. तसेच भारताचा कर्णधार विराट कोहली, जसप्रीत बुमराह, इंग्लंडचा यष्टीरक्षक जोस बटलर यांनीही धोनीबद्दल मत व्यक्त केलं आहे.

वर्ल्ड कपमध्ये धोनीला फलंदाजीवरून अनेकांनी ट्रोल केलं. काही दिग्गज क्रिकेटपटूंनीही त्याच्या खेळीवर मत व्यक्त केलं होतं. त्याच्या फिटनेसवरूनही सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. मात्र, लंकेविरुद्धच्या सामन्यात त्यानं झेल घेण्यात दाखवलेली चपळाई पाहिली तर अजून धोनीमध्ये खेळ बाकी आहे असंच म्हणावं लागेल. त्याने अफगाणिस्तान वगळता इतर संघाविरुद्ध चांगल्या स्ट्राईक रेटनं धावा केल्या आहेत. आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये धोनीने 8 सामन्यात 93.30 च्या सरासरीने 223 धावा केल्या आहेत. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. याशिवाय धोनीने 6 झेल आणि 3 स्टम्पिंग केले आहे.

अफगाणिस्तानविरुद्ध केलेल्या संथ खेळीनंतर धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू होती. मात्र, त्यानं लंकेविरुद्धच्या सामन्याआधी मला स्वत:ला निवृत्ती कधी घेणार ते माहिती नसल्याचं सांगितल्यानं त्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.

VIDEO: धोनीला पाहायचंय? या ठाण्याच्या मॉलमध्ये!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 6, 2019 07:37 PM IST

ताज्या बातम्या