16 वर्षांनंतरही सचिनच मास्टर, कोणीही मोडू शकलं नाही 'हे' रेकॉर्ड!

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची संधी फलंदाजांना होती मात्र एकालाही ती साधता आली नाही.

News18 Lokmat | Updated On: Jul 14, 2019 09:14 PM IST

16 वर्षांनंतरही सचिनच मास्टर, कोणीही मोडू शकलं नाही 'हे' रेकॉर्ड!

भारताचा सलामीवीर रोहित शर्मा सेमीफायनलमध्ये एका धावेवर बाद झाला असला तरी त्याने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वांना मागं टाकलं आहे. त्याला एका वर्ल्ड कपमध्ये सचिनचा विक्रम मोडता आला नसला तरी यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये त्यानं सर्वाधिक धावा केल्या आहेत.

रोहित शर्माने 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये 648 धावा केल्या आहेत. त्याच्यानंतर डेव्हिड वॉर्नर 647 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचंही आव्हान सेमीफायनलमध्येच संपुष्टात आल्यानं वॉर्नरसुद्धा सर्वाधिक धावा करण्याच्या स्पर्धेतून बाहेर पडला होता.

वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करण्यात बांगलादेशचा शाकिब अल हसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. साखळी फेरीत आव्हान संपुष्टात आलेल्या बांगलादेशच्या शाकिब अल हसनने 606 धावा केल्या आहेत.

इंग्लंडचा जो रूट पाचव्या स्थानावर आहे. फायनलमध्ये त्याला फक्त 7 धावा करता आल्या. जो रूटनं 576 धावा केल्या आहेत. त्याला अंतिम सामन्यात 600 धावांचा टप्पाही पार करता आला नाही.

2019 च्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन चौथ्या क्रमांकावर आहे. त्याला रोहितला मागे टाकण्याची संधी होती. पण अंतिम सामन्यात 30 धावांवर बाद झाल्याने केन विल्यम्सनच्या 578 धावा झाल्या आहेत.

Loading...

एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये 673 धावा केल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 14, 2019 09:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...