World Cup : VIDEO : मोहम्मद शमीनं केली नक्कल, कॉट्रेलनं दिलं हिंदीतून उत्तर!

World Cup : VIDEO : मोहम्मद शमीनं केली नक्कल, कॉट्रेलनं दिलं हिंदीतून उत्तर!

ICC Cricket World Cup 2019 : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने कॉट्रेल बाद होताच त्याच्या सॅल्यूटची नक्कल केली होती.

  • Share this:

मँचेस्टर, 28 जून : वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना भारताने एकतर्फी जिंकला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 268 धावा केल्या. त्यानंतर वेस्ट इंडिजचा डाव 143 धावांत गुंडाळून 125 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने 4 गडी बाद करत विंडीजच्या फलंदाजीतली हवा काढून घेतली. या सामन्यात चर्चा झाली ती शमीने कॉट्रेलच्या फौजी स्टाईल सेलिब्रेशनच्या नकलेची. शमीने त्याची खिल्ली उडवली त्यावर कॉट्रेलनं सोशल मिडीयावरून उत्तर दिलं आहे.

कॉट्रेलनं शमीला हिंदीतून उत्तर दिलं आहे. त्याने रोमन भाषेत हिंदी लिहून शमीने उडवलेल्या खिल्लीवर प्रतिक्रिया दिली आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात कॉट्रेल बाद झाला तेव्हा शमीने त्याची नक्कल केली. युझवेंद्र चहलने 30 व्या षटकात कॉट्रेलला पायचित केलं.

शमीने कॉट्रेलची खिल्ली उडवली तेव्हा युझवेंद्र चहल, विराट कोहलीलासुद्धा हसू आवरले नव्हते. शमीने अशा प्रकारे खिल्ली उडवलेलं चाहत्यांना मात्र आवडलं नव्हतं. त्याला ट्रोलही करण्यात आलं. कॉट्रेलनं यावर उत्तर देताना म्हटलं की, खूप मज्जा आली. मस्त गोलंदाजी. नक्कल करणं हा आगाऊपणा आहे. एवढं म्हणत कॉट्रेलनं यावरून कोणताही वाद होण्य़ापूर्वी त्यावर पडदा टाकला.

शेल़्डन कॉट्रेल जेव्हा विकेट घेतो तेव्हा तो सॅल्यूट करतो. यामाध्यमातून जमैकाच्या सुरक्षा दलाला सलामी देत आभार मानतो. वर्ल्ड कपमध्ये त्याची ही जल्लोषाची पद्धत लोकप्रिय झाली आहे. अनेकजण त्याची नक्कल करताना दिसले आहेत. कॉट्रेलनं आतापर्यंत 7 सामन्यात 11 विकेट घेतल्या आहेत. त्याने वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत.

वाचा- भारताच्या विजयाने पाकिस्तान खुश, सेमीफायनलची समीकरणे बदलली

वाचा- World Cup : विराटचं ट्रम्प कार्ड, शमी म्हणजे विजयाची हमी!

वाचा- VIDEO : पाहा पांड्याचं कूल सेलिब्रेशन, विकेट मिळताच बसून वाजवल्या टाळ्या!

फुटबॉल खेळणारा हत्ती कधी पाहिलाय का? VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 28, 2019 05:18 PM IST

ताज्या बातम्या