लंडन, 05 जुलै : ICC Cricket World Cup मध्ये लंकेचे आव्हान संपुष्टात आले आहे. त्यांचा शेवटचा सामना भारताशी 6 जुलैला होणार आहे. या सामन्याआधी बोलताना लंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा म्हणाला की, भारत 2011 चा इतिहास पुन्हा घडवू शकतो. विराट आणि धोनी भारताचे हुकमी एक्के ठरतील. भारताजवळ अनुभवी खेळाडू आहेत. तसेच सलामीवीर रोहित शर्मा फॉर्ममध्ये आहे. भारताकडे सामना जिंकून देणाऱ्या खेळाडूंचा भरणा असल्याचं मलिंगा म्हणाला.
भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीनं निवृत्ती घ्यावी. त्याच्यात पुर्वीसारखा खेळ राहिला नाही अशी टीका सर्वच स्तरातून होत आहे. याबद्दल मलिंगा म्हणाला की, धोनीनं अजून एकदोन वर्ष खेळायला हवं. त्यानं त्याच्यासारखे खेळाडू तयार करायला हवेत जे फिनिशर असतील. तो आजही क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फिनिशर आहे. त्याची जागा घेणं कठीण आहे असं मलिंगा म्हणाला.
लंकेच्या या वेगवान गोलंदाजाने भारताच्या वेगवान गोलंदाजाचं कौतुक केलं. बुमराहच्या यॉर्करपेक्षा त्याची अचूकता धोकादायक असल्याचं मलिंगा म्हणाला. बुमराहची सर्वात चांगली गोष्ट ही आहे की त्याचा क्षमतेवर विश्वास आङे. यामुले स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचा दबाव राहत नाही. दबाव म्हणजे तुमच्याकडं योग्यता नसल्याचा प्रकार आहे असंही मलिंगाने सांगितलं.
बुमराहनं खूप कमी काळात मोठी झेप घेतली आहे. मी त्याला 2013 मध्ये पाहिलं होतं. त्याच्याकडे शिकण्याची वृत्ती आहे आणि लवकर आत्मसात करतो असं मलिंगा म्हणाला.
यॉर्करबद्दल बोलताना मलिंगाने सांगितलं की, कोणीही यॉर्कर, संथ गतीने चेंडू फेकू शकतो. पण गोलंदाजी करताना अचूक मारा करणं महत्त्वाचं असतं. तुम्ही कितीवेळा एकाच जागी चेंडू टाकू शकता? त्यानंतर खेळाबद्दल सांगता येईल.
World Cup : श्रीलंकेविरोधात बुमराह खेळण्याची शक्यता कमी, कोण घेणार जागा?
World Cup: भर मैदानात निर्वस्त्र शिरला चाहता, सामन्यात घातला धिंगाणा