World Cup : पराभवानंतर धोनीला केन विल्यम्सननं दिली ही ऑफर, पाहा VIDEO

World Cup : पराभवानंतर धोनीला केन विल्यम्सननं दिली ही ऑफर, पाहा VIDEO

ICC Cricket World Cup : धोनीने सेमीफायनलमध्ये 72 चेंडूत 50 धावा केल्या म्हणून पुन्हा ट्रोल केलं जात आहे.

  • Share this:

मँचेस्टर, 11 जुलै : ICC Cricket World Cup च्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडनं भारताला 18 धावांनी पराभूत केलं. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 239 धावा केल्या. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताला 221 धावांपर्यंत मजल मारता आली. एकवेळ भारताची अवस्था 6 बाद 92 अशी झाली होती. त्यानंतर धोनी आणि जडेजाने 116 धावांची भागिदारी करून भारताच्या विजयाच्या आशा निर्माण केल्या. मात्र, 48 व्या षटकात जडेजा 77 धावांवर बाद झाला त्यानंतर 49 व्या षटकात धोनी धावबाद झाला.धोनी आणि जडेजा जोपर्यंत मैदानावर होते तोवर भारत विजय मिळवण्याची शक्यता होती.

सामना संपल्यानंतर बोलताना धोनीच्या स्ट्राइक रेटबद्दल विराटला प्रश्न विचारला गेला. तसेच धोनीला सातव्या क्रमांकावर का पाठवले गेले असेही विचारण्यात आले. तेव्हा कोहली म्हणाला की, जेव्हा एक खेळाडू फटकेबाजी करत असतो तेव्हा दुसऱ्याला सावध खेळी करायची असते. धोनी आणि जडेजा यांच्यात जडेजानं फटकेबाजी केली. तसेच त्या दोघांच्यानंतर संघाकडे एकही फलंदाज शिल्लक नव्हता.

World Cup : पंचांच्या चुकीचा भारताला फटका अन् धोनी झाला धावबाद?

भारताच्या कर्णधाराने धोनीची बाजू घेतली पण न्यूझीलंडच्या कर्णधाराने धोनीनं नागरिकत्व बदललं तर त्याला संघात घेऊ असं म्हटलं आहे. केन विल्यम्सनला विचारण्यात आलं की, भारताच्या पराभवानंतर धोनीला जबाबदार धरलं जात आहे. त्याला तू संघात घेशील का?

केन विल्यम्सनने सांगितलं की, धोनी वर्ल्ड क्लास खेळाडू आहे. त्याने जडेजासोबत जी भागिदारी केली ती महत्त्वाची होती. त्यानं नागरिकत्व बदललं तर नक्कीच विचार करता येईल असं विल्यम्सन म्हणाला.

वाचा- INDvsNZ : विल्यम्सनने 11 वर्षापूर्वीच्या पराभवाचा घेतला बदला!

वाचा- World Cup : 20 हजार 645 धावा करणारे फलंदाज झाले केवळ 3 धावांवर बाद

वाचा- World Cup जिंकण्याचं भारताचं स्वप्न 'या' कारणांनी भंगलं!

कोब्रा आणि बेडकामध्ये जगण्यासाठी लढाई, VIDEO व्हायरल

First published: July 11, 2019, 10:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading