World Cup : धोनीच्या संथ खेळीवर बुमराहचा यॉर्कर!

World Cup : धोनीच्या संथ खेळीवर बुमराहचा यॉर्कर!

ICC Cricket World Cup 2019 : भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीच्या संथ खेळीवरून अनेकांनी टीका केली. त्यांना धोनीने वेस्ट इंडिजविरुद्ध अर्धशतक करून उत्तर दिलं.

  • Share this:

लंडन, 28 जून : ICC Cricket World Cup मध्ये भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध 125 धावांनी विजय मिळवला. सेमीफायनल गाठण्यासाठी भारताला फक्त एका विजयाची गरज आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या अर्धशतकांनंतर शमी, बुमराहच्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने विजय मिळवला. बुमराहने 6 षटकांत 9 धावा देत 2 गडी बाद केले. सामन्यानंतर त्याने चहलसोबत केलेल्या चर्चेत धोनीच्या यष्टीरक्षणासह फलंदाजीचं कौतुक केलं.

बुमराहब म्हणाला की, धोनीचा झेल तर सर्वांनीच पाहिला. इतक्या वर्षांपासून क्रिकेट खेळत असलेल्या धोनीने नेहमीच असे झेल पकडले आहेत. त्याचं योगदान सर्वांना माहिती आहे.

धोनीच्या फलंदाजीबद्दलही बुमराहनं कौतुक केलं. तो म्हणाला की, कधी कधी धोनी धीम्या गतीने फलंदाजी करतो असं वाटतं. तो वेळ घेतो पण काही खेळपट्ट्यांचा अंदाज घेणं गरजेचं असतं. त्याने शेवटी केलेल्या फटकेबाजीमुळंच भारताला 268 धावांचं आव्हान उभा करता आलं. त्याचा अनुभव खूप महत्त्वाचा ठरतो. त्याला त्याच्या क्षमतेवर विश्वास आहे.

धोनीने अफगाणिस्तानविरुद्ध 52 चेंडूत 28 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याच्यावर टीका करण्यात येत होती. त्यानंतर झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात धोनीने 61 चेंडूत 56 धावा केल्या. भारताने आतापर्यंत 6 पैकी 5 सामने जिंकले आहेत. गुणतक्त्यात भारत दुसऱ्या स्थानावर असून सेमीफायनलला पोहचण्यासाठी एक विजय गरजेचा आहे.

वाचा- भारताच्या विजयाने पाकिस्तान खुश, सेमीफायनलची समीकरणे बदलली

वाचा- World Cup : विराटचं ट्रम्प कार्ड, शमी म्हणजे विजयाची हमी!

वाचा- VIDEO : पाहा पांड्याचं कूल सेलिब्रेशन, विकेट मिळताच बसून वाजवल्या टाळ्या!

फुटबॉल खेळणारा हत्ती कधी पाहिलाय का? VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 28, 2019 09:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading