मुंबई, 13 जुलै : भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजानं केलेल्या 77 धावांच्या खेळीमुळे सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध नामुष्कीजनक पराभव टळला. त्याने केलेल्या वेगवान खेळीनंतरही भारताला 18 धावांनी पराभूत व्हावं लागलं. यामुळे भारताचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न उद्ध्वस्त झालं. सामन्यानंतर जडेजा पूर्ण खचून गेला होता आणि रडत होता असं त्याची पत्नी रीवाबानं म्हटलं आहे.
जडेजान मैदानावर उतरला तेव्हा संघाची अवस्था 6 बाद 92 अशी झाली होती. त्याने धोनीसोबत सातव्या विकेटसाठी 116 धावांची भागिदारी केली. 59 चेंडूत 77 धावा काढून भारताच्या विजयाच्या आशा निर्माण केल्या होत्या. मात्र, फटकेबाजी करण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानंतर धोनीही धावबाद झाला आणि उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आल्या.
Sports has taught me to keep on rising after every fall & never to give up. Can’t thank enough each & every fan who has been my source of inspiration. Thank you for all your support. Keep inspiring & I will give my best till my last breath. Love you all pic.twitter.com/5kRGy6Tc0o
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) July 11, 2019
जडेजाची पत्नी रीवाबाने बॉम्बे टाइम्सशी बोलताना सांगितलं की, पराभवानंतर त्याचं रडणं थांबत नव्हतं तो सतत बडबडत होता की मी आउट झालो नसतो तर आम्ही जिंकलो असतो. जेव्हा तुम्ही विजयाच्या इतक्या जवळ येता आणि पराभव होतो तेव्हा त्रास होतो. यातून सावरण्यासाठी वेळ लागेल.
विराट नको रोहितकडे द्या नेतृत्व, भारताच्या क्रिकेटपटूची मागणी!
रीवाबा म्हणाली की, त्याच्या त्या कामगिरीबद्दल आश्चर्य वाटलं नाही. तो नेहमीच मोठ्या सामन्यांमध्ये खेळला आहे. जर त्याची कामगिरी पाहिली तर दिसेल. गोलंदाजी आणि फलंदाजीतही कमाल केली आहे. आपण 2013 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली तेव्हा रविंद्र जडेजानं अंतिम सामन्यात अष्टपैलू खेळी केली होती. त्या सामन्यात जडेजाला सामनावीर पुरस्कारही मिळाला होता.
ऑपरेशन लोटसचं पुढचं टारगेट आता मध्य प्रदेश आणि राजस्थान?