LIVE NOW

World Cup : भारताचा सेमीफायनलला प्रवेश, बांगलादेशवर 28 धावांनी विजय

ICC Cricket World Cup : भारताने या विजयासह 13 गुण मिळवले असून सेमीफायनलला स्थान पक्कं केलं आहे.

Lokmat.news18.com | July 2, 2019, 11:16 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated July 2, 2019
auto-refresh

Highlights

11:16 pm (IST)
Load More
World Cup: India vs Bangladesh Live Score- भारताने दिलेल्या 315 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशनं 286 धावांपर्यंत मजल मारली. या विजयासह भारताने सेमीफायनलचं तिकीट पक्कं केलं आहे तर बांगलादेशच्या आशा संपुष्टात आल्या. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने अर्धशतकी खेळी केली. शाकिबला बाद करून पांड्याने मोठं यश मिळवून दिलं. शाकिबने 74 चेंडू 66 धावा केल्या. त्याच्याशिवाय सौम्या सरकार, शब्बीर रहमान आणि मोहम्मद सैफुद्दीन यांनी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. भारताच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत धावगती नियंत्रणात आणली. बुमराहने 4 तर पांड्याने 3 विकेट घेतल्या. चहल, भुवी आणि शमीने प्रत्येकी एक विकेट घेतली. बांगलादेशविरुद्ध भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी 180 धावांची खेळी केली. रोहित शर्माने 104 तर केएल राहुलनं 77 धावांची खेळी करून भारताला भक्कम सुरूवात करून दिली. मात्र, त्यानंतरही भारताचा डाव गडगडला. 1 बाद 180 मध्ये 134 धावांची भर घालण्यासाठी भारताने 8 गडी गमावले. भारताने 50 षटकांत 9 बाद 314 धावा केल्या. विराट कोहली 26 धावांवर बाद झाल्यानंतर पांड्या शून्यावर बाद झाला. त्यानंतर ऋषभ पंत 48 धावा काढून बाद झाला. पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी मिळालेल्या दिनेश कार्तिकला 8 धावा करता आल्या. त्याच्यानंतर फटकेबादी करण्याच्या नादात धोनी झेलबाद झाला. त्याने 35 धावा केल्या. बांगलादेशकडून मुस्तफिझुर रहमानने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या.