INDvsWI : भारताच्या निवड समितीसमोर प्रश्न, कोणाला द्यायची संधी?

वेस्ट इंडीज दौऱ्यावर भारतीय संघात नव्या दमाच्या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे.

  • Share this:

ICC Cricket World Cup नंतर भारत वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध भारतीय संघ 3 टी-20 सामने, 3 वनडे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. यासाठी भारतीय संघाची निवड रविवारी बीसीसीआयच्या बैठकीत होणार आहे. यात निवड समितीसमोर अनेक प्रश्न असणार आहेत.

सध्या धोनीच्या निवृत्तीची चर्चा होत आहे. धोनीने वेस्ट इंडीज दौऱ्यातून माघार घेतल्याने त्याच्या निवडीचा प्रश्न बाजूला पडला आहे. धोनीच्या जागी सक्षम पर्याय म्हणून ऋषभ पंतकडे पाहिलं जात आहे.

भारतासमोर वर्ल्ड कपच्या आधीपासून चौथ्या क्रमांकाचा प्रश्न आहे. वर्ल्ड कपमध्ये सुरुवातील केएल राहुल चौथ्या क्रमांकावर खेळला. मात्र, शिखर धवन स्पर्धेतून बाहेर झाल्यानं त्याला सलामीला खेळावं लागलं. त्यानंतर विजय शंकर, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत चौथ्या क्रमांकावर खेळले. यांच्यापैकी कोणालाच चौथ्या क्रमांकावर अपेक्षित खेळी करता आली नाही. इंडिया ए संघात खेळत असलेल्या मनीष पांडे, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांची नावे आघाडीवर आहेत.

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला दौऱ्यातून विश्रांती दिली जाईल. तर शमीलासुद्धा मर्यादित षटकांच्या मालिकेत विश्रांती देण्याचा विचार आहे. त्यामुळे नवदीप सैनीला संधी मिळू शकते. याशिवाय खलील अहमदसुद्धा संघात स्थान मिळवू शकतो. दरम्यान टी20 संघात दीपक चाहरला संधी मिळू शकते. त्याला वर्ल्ड कपमध्ये स्टँडबायसाठी ठेवला होता. त्याने नेटमध्ये भारतीय फलंदाजांना गोलंदाजी केली होती.

भारताचा सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉसुद्धा दुखापतीने या दौऱ्याला मुकणार आहे.  त्यांच्या जागी मयंक अग्रवाल आणि केएल राहुल सलामीला उतरण्याची शक्यता आहे. यात विजय शंकर किंवा हनुमा विहारी यांना घ्यायचे असाही प्रश्न बीसीसीआयसमोर असेल.

भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौऱा 3 ऑगस्टपासून सुरु होत आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 3 टी-20 सामने, 3 वनडे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. दौऱ्याची सुरुवात टी-20 मालिकेने होणार आहे. त्यानंतर 8 ऑगस्टपासून वनडे तर 22 ऑगस्टला पहिला कसोटी सामना सुरू होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 20, 2019 03:26 PM IST

ताज्या बातम्या