VIDEO : रोहित बाद नव्हता? तिसऱ्या पंचांनाही समजलं नाही!

VIDEO : रोहित बाद नव्हता? तिसऱ्या पंचांनाही समजलं नाही!

ICC Cricket World Cup रोहित शर्माच्या झेलबादचे अपिल मैदानावरील पंचांनी फेटाळून लावलं होतं. त्यानंतर डीआरएस रिव्ह्यूमध्ये रोहितला बाद देण्यात आलं.

  • Share this:

मँचेस्टर, 27 जून : ICC Cricket World Cup स्पर्धेत भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्यात भारताला सलामीवीर रोहित शर्मा फक्त 18 धावांवर बाद झाला. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातही रोहित शर्मा एक धाव काढून बाद झाला होता. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेल्या भारताला वेस्ट इंडिजचा गोलंदाज केमार रोचने पहिला धक्का दिला. त्याच्या गोलंदाजीव रोहित शर्मा यष्टीरक्षक शाय होपकडे देल देऊन बाद झाला.

रोहित शर्माच्या झेलबादचे अपिल केल्यानंतर मैदानावरील पंचांनी ते फेटाळून लावलं होतं. मात्र, वेस्ट इंडिजने डीआरएस घेतला. यात तिसऱ्या पंचांनी रोहितला बाद दिलं. रोहित टिव्ही रिप्लेमध्ये चेंडू बॅटला नाही तर पॅडला लागून गेल्याचं दिसत होतं. त्यातही बॅट आणि पॅड दोन्हीही चेंडूच्या जवळ असल्यानं नेमका चेंडू कशाला लागला हे स्पष्ट झालं नाही.

तिसऱ्या पंचांनी अल्ट्रा एजमध्ये पाहून रोहित शर्माला झेलबाद दिलं. हा निर्णय दिल्यानंतर रोहितलासुद्धा धक्का बसला. त्याने पंचांचा निर्णय मान्य केला आणि मैदान सोडले. पण त्याला वाटत होते की चेंडू बॅटला लागलेला नाही. मैदानावरून बाहेर जाताना पंचांच्या निर्णयावर त्याची नाराजी लपून राहिली नाही.

विराटसेनेनं आतापर्यंत चार सामने जिंकले आहेत तर, एक सामना पावसामुळं रद्द झाला. आज वेस्ट इंडिजला नमवून भारत सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकतो. मात्र वेस्ट इंडिजला नमवणे, भारतासाठी सोपे असणार नाही. कारण न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात कार्लोस ब्रॅथवेटने केलेली तुफानी खेळी सर्वांच्या स्मरणात राहणारी आहे. वेस्ट इंडिजला केवळ पाच धावांनी पराभव पत्करावा लागल्याने सेमीफायनलमध्ये पोहचण्याच्या आशा संपुष्टात आल्या.

वाचा- World Cup IND vs WI : 'माही मार रहा है', आज सिद्ध करून दाखवण्याची संधी!

वाचा- गेली 23 वर्ष भारत 'या' संघाविरुद्ध अपराजीत राहिला; आज काय होणार?

वाचा- सामन्याआधीच भारतानं इंग्लंडला दिला दणका, हिसकावून घेतले पहिले स्थान

टीम इंडियाच्या भगव्या जर्सीची राजकीय बॅटिंग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2019 04:43 PM IST

ताज्या बातम्या