Elec-widget
LIVE NOW

India Vs New Zealand Live Score : भारताचं वर्ल्ड कपचं स्वप्न भंगलं, न्यूझीलंड फायनलमध्ये

न्यूझीलंडला केवळ 239 धावा करता आल्या. त्यामुळं भारताला विजयासाठी 240 धावांचे आव्हान असणार आहे.

Lokmat.news18.com | July 10, 2019, 7:27 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated July 10, 2019
auto-refresh

Highlights

Load More
मॅंचेस्टर, 10 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सेमीफायनलमधील सामना काल (मंगळवारी) थांबवण्यात आला होता. न्यूझीलंडनं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे आघाडीचे तीन फलंदाज फक्त एक धाव काढून बाद झाले. भारताचा डाव 221 धावांवर संपुष्टात आला भारत 18 धावांनी सामना हरला. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल हे तिघे लागोपाठ बाद झाले. त्यानंतर दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत संथ खेळी करत असताना दिनेश कार्तिक सहा धावांवर बाद झाला. त्यानंतर ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांची चांगली भागिदारी असतानाच पंत 32 धावांवर बाद झाला. त्यानंतर हार्दिक पांड्या 32 धावांवर बाद झाला. पांड्यानंतर जडेजा आणि धोनी यांनी शतकी भागिदारी केली. जडेजानं आक्रमक फलंदाजी करत आपलं अर्धशतक केवळ 39 धावांत पूर्ण केले. मात्र, जडेजा 77 धावांवर बाद झाला. धोनीनं 49 धावांवर धावबाद झाला. त्यानंतर भुवनेश्वर कुमार मंगळवारी न्यूझीलंडने 46.1 षटकात 5 बाद 211 धावा केल्या होत्या. त्यामुळं आज 46.2 चेंडूपासून न्यूझीलंडचा सामना झाला. भुवनेश्वर कुमारनं आपले चार चेंडू टाकत 8 धावा दिल्या. रॉस टेलर आणि टॉम लॅथम सध्या फलंदाजी करत होते. जडेजाचा अफलातून थ्रोवर रॉस टेलर बाद झाला. त्यानंतर लॅथमचा जडेजानं उत्तम झेल पकडला. त्यामुळं भारताला धावांचे 240 आव्हान मिळाले. भारताकडून भुवनेश्वर कुमारनं तीन विकेट घेतल्या. तर, जडेडा, चहल आणि बुमराह यांनी एक-एक विकेट घेतल्या. न्यूझीलंडकडून टेलरनं 74 धावा केल्या.