INDvsNZ : विल्यम्सनने 11 वर्षापूर्वीच्या पराभवाचा घेतला बदला!

INDvsNZ : विल्यम्सनने 11 वर्षापूर्वीच्या पराभवाचा घेतला बदला!

ICC Cricket World Cup न्यूझीलंडने भारताला 18 धावांनी पराभूत करून सलग दुसऱ्यांदा फायनलला धडक मारली आहे.

  • Share this:

मँचेस्टर, 10 जुलै : ICC Cricket World Cup मध्ये भारत सेमीफायनलमधून बाहेर पडला. रोमहर्षक सामन्यात न्यूझीलंडने 18 धावांनी विजय मिळवला. त्यांनी सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक मारली आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने या विजयासह त्याने 11 वर्षापुर्वीच्या पराभवाचा बदला घेतला. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन दोघेही 11 वर्षांपूर्वी 2008 मध्ये अंडर 19 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलला भिडले होते. तेव्हाही दोघे आपआपल्या देशाचं नेतृत्व करत होते.

2008 मध्ये झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलला भारत आणि न्यूझीलंड सेमीफायनलला पोहचले होते. सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करत भारताला 205 धावांचं आव्हान दिलं होतं. या सामन्यात विराटने गोलंदाजीत जबरदस्त कामगिरी करत 7 षटकांत 27 धावा देत 2 बळी घेतले होते. भारताने तेव्हा सेमीफायनलच नाही तर फायनलमध्ये आफ्रिकेला पराभूत करून अंडर 19 वर्ल्ड कपही जिंकला होता.

सेमीफायनलच्या त्या सामन्यात पावसामुळे भारताला 43 षटकांत 191 धावांचे आव्हान मिळाले होते. भारताकडून श्रीवत्स गोस्वामीने 51 आणि कोहलीने 43 धावा केल्या होत्या. भारताने हा सामना 9 चेंडू आणि 3 गडी राखून जिंकला होता. विराटच्या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला होता.

2008 मध्ये फक्त विराट आणि विल्यम्सन आमनेसामने नव्हते तर रविंद्र जडेजासुद्धा त्या संघात होता. तर न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्ट आणि टिम साउदी अंडर 19 वर्ल्ड कप खेळत होता. आता 11 वर्षांनी हे खेळाडू पुन्हा सेमीफायनलमध्ये एकमेकांसमोर आले होते.

वर्ल्ड कप 2019 मध्ये भारताने साखळी फेरीत फक्त एक सामना गमावला होता. भारत आणि न्यूझीलंड यांचा साखळी फेरीतील सामना पावसाने रद्द झाला होता.

SPECIAL REPORT : भक्तांची अलोट गर्दी जेव्हा अ‍ॅम्ब्युलन्सला वाट करून देते!

First published: July 10, 2019, 8:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading