World Cup : VIDEO : इंग्लंडच्या खराब कामगिरीनं विराट हैराण!

ICC Cricket World Cup : इंग्लंडला सुरुवातील जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानलं जात होतं मात्र आता त्यांच्यावर स्पर्धेतून बाहेर पडण्याची वेळ आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 29, 2019 07:25 PM IST

World Cup : VIDEO : इंग्लंडच्या खराब कामगिरीनं विराट हैराण!

लंडन, 29 जून : ICC Cricket World Cup स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. सहापैकी भारताने 5 सामने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडविरुद्धचा एक सामना पावसामुळे रद्द झाला. भारताचा पुढचा सामना इंग्लंडशी होणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडच्या कामगिरीबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या इंग्लंडवर सध्या वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याची नामुष्की ओढावण्याची शक्यता आहे.

विराट म्हणाला की, इंग्लंडच्या खराब कामगिरीने सर्वच हैराण आहेत. आम्हालाही त्याची कामगिरी अनपेक्षित अशीच आहे. घरच्या मैदानावर इंग्लंडकडून चांगल्या खेळाची अपेक्षा होती. मात्र या स्पर्धेत दबाव खूप मोठा मुद्दा असतो असं विराट म्हणाला.

इंग्लंडने आतापर्यंत 7 सामन्यापैकी 4 सामन्यात विजय मिळवला आहे. तर तीन सामन्यात पराभव झाला आहे. त्यांचे उर्वरित सामने भारत आणि न्यूझीलंडविरुद्ध आहेत. यात एक जरी सामना गमावला तरी सेमीफायनल गाठणं कठीण होणार आहे.

Loading...

भारताच्या मधल्या फळीतील खेळाडूंची कामगिरी सध्या चिंतेचा विषय़ आहे. तर धोनीच्या संथ खेळीवरूनही टीका होत आहे. याबद्दल विराट म्हणाला की, धोनीला माहिती आहे त्याला काय करायचे आहे. त्याला ते दुसऱ्या कोणी सांगण्याची गरज नाही. मैदानाबाहेर अनेक गोष्टी होत असतात. धोनीवर सर्वांना विश्वास आहे म्हणत कोहलीने समर्थन केलं.

विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या सामन्याआधी बोलताना म्हटलं की, आतापर्यंत भारताने विजय मिळवला आहे. तरीही कोणत्याही सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला कमकुवत समजण्याची चूक आम्ही करणार नाही. आतापर्यंत दोन वर्ल्ड कपचा माझा अनुभव आहे. कोणताही संघ कोणालाही पराबूत करु शकतो. अफगाणिस्तानने आमच्याविरुद्ध चांगली कामगिरी केली.

इंग्लंडच्या खेळपट्टीवरून आतापर्यंत अनेक चर्चा झाल्या. लंकेनं या खेळपट्ट्यांबाबत नाराजीही व्यक्त केली होती. यावर आता कोहलीनेसुद्धा मत व्यक्त केलं आहे. भारताला खेळपट्टीशी काही देणं-घेणं नाही. तेव्हाची परिस्थिती पाहून खेळावं लागेल. खेळपट्टी फलंदाजीला पोषक नसेल तर गोलंदाजीच्या जोरावर सामना जिंकता येतो असंही त्यानं सांगितलं.

World Cup : पंतला संधी नाहीच! धोनी आणि शंकरबद्दल काय म्हणाला विराट?

World Cup : शोएब अख्तरचा भारतावर गंभीर आरोप!

एका हातात जनतेचे प्रश्न दुसऱ्या हातात सिगरेट, पाहा काँग्रेस मंत्र्याचा प्रताप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2019 07:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...