World Cup : केएल राहुलला दुखापत, पंत उतरणार सलामीला?

World Cup : केएल राहुलला दुखापत, पंत उतरणार सलामीला?

ICC Cricket World Cup भारताने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विजय शंकरच्या जागी ऋषभ पंतला संधी दिली आहे.

  • Share this:

बर्मिंगहम, 30 जून : ICC Cricket World Cup वर्ल्ड कपमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना सुरु आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करून ऋषभ पंतला संघात स्थान दिलं आहे. विजय शंकरच्या जागी डावखुरा फलंदाज असलेल्या पंतची वर्णी लागली आहे. शंकरच्या पायाला दुखापत झाल्यानं त्याला विश्रांती देण्यात आली आहे. विराटने नाणेफेकीनंतर सांगितलं की, खरंतर या सामन्यात आम्हालासुद्धा फलंदाजी करायची होती. पण ठीक आहे धावांचा पाठलाग करायला आवडेल.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंतला संघात संधी मिळाली असून तो सलामीला खेळू शकतो. सामन्यावेळी क्षेत्ररक्षण करताना केएल राहुलला जखम झाली आहे. केएल राहुल सलामीचा फलंदाज आहे. राहुल मैदानातून बाहेर गेला असला तरी तो फलंदाजीला उतरणार आहे. मात्र, तो कोणत्या क्रमांकावर उतरेल हे सांगता येत नाही. जर केएल राहुल सलामीला आला नाही तर ऋषभ पंत सलामीला उतरू शकतो.

16 व्या षटकात चहलच्या गोलंदाजीवर जॉनी बेअरस्टोनं मारलेला चेंडू झेलण्याच्या नादात केएल राहुलने मोठी उडी मारली. यात तो पाठीवर पडला. त्यानंतर क्षेत्ररक्षण करताना केएल राहुलला त्रास जाणवला. तेव्हा तो टीम फीजिओंसोबत चर्चा केल्यानंतर मैदानातून बाहेर गेला. त्याच्या जागी रविंद्र जडेजा क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर आला.

भारत-पाक सामन्याकडे इतर दोन संघांचे लक्ष लागून राहिलं आहे. सध्या बांगलादेश आणि पाकिस्तानला सेमीफायनलला पोहचण्याच्या आशा आहेत. इंग्लंडचा पराभव झाला तर त्या दोन्ही संघांना सेमीफायनलचे मार्ग खुले राहतील. विराटने यावरही प्रतिक्रिया दिली. विराट म्हणाला की, माझा विश्वास आहे की आम्हाला पाकचा सपोर्ट असेल जी खूप दूर्मीळ गोष्ट आहे असं सांगत तो हसला.

चौथ्या क्रमांकावर कोण?

वर्ल्ड कपमध्ये 5 सामन्यात भारताने चार नंबरवर तीन फलंदाज खेळवले.यात ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुद्ध हार्दिक पांड्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. पांड्या नेहमी सातव्या क्रमांकावर फलंदाजी करतो पण सामन्यातील परिस्थिती पाहून त्याला बढती दिली गेली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात केएल राहुलला संधी देण्यात आली होती. चौथ्या क्रमांकासाठी तोच योग्य पर्याय होता. मात्र, शिखर धवन स्पर्धेला मुकल्यानं त्याला सलामीला उतरावं लागत आहे. त्यामुळे अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज विरुद्ध विजय शंकर चौथ्या क्रमांकावर उतरला. त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. तसेच रोहित आणि विराट कोहली बाद झाल्यानंतर धावगतीचा वेगही मंदावतो. भारतासमोर सध्यातरी मधल्या फळीतील फलंदाजी डोकेदुखी ठरत आहे.

वर्ल्ड कपमध्ये सध्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या विजय शंकरच्या जागी पंतला संधी दिली आहे.रिषभ पंतने आतापर्यंत 5 एकदिवसीय सामने खेळले आहेत. याशिवाय 9 कसोटी सामन्यात त्याने आपला खेळ दाखवला आहे. यात त्याने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये खेळताना शतकसुद्धा केलं आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये रिषभ पंतने 16 सामन्यात 488 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेतून पदार्पण करणाऱ्या विजय शंकरला वर्ल्ड कपमध्ये फक्त एकदा चौथ्या क्रमांकावर फंलदाजी करण्याची संधी मिळाली आहे. त्याने अफगाणिस्तानविरुद्ध फक्त 29 धावा केल्या. शंकर गोलंदाजीसुद्धा करू शकतो. त्याने पाकिस्तानविरुद्ध मिळालेल्या संधीचं सोनं केलं. भुवनेश्वर कुमारचे अर्धवट षटक पूर्ण करताना त्याने वर्ल्ड कपमधील पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. भारताकडून अशी कामगिरी कोणत्याच गोलंदाजाला करता आलेली नाही. पाकविरुद्धच्या सामन्यात दोन गडी बाद करून शंकरने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली. मात्र, त्यानंतर त्याला गोलंदाजी दिली नाही.

VIDEO: कंडक्टर मुलीला आंटी म्हणाला आणि बसमध्ये झाला राडा

First published: June 30, 2019, 6:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading