World Cup : भडकलेल्या विराट कोहलीला ICC चा दणका

World Cup : भडकलेल्या विराट कोहलीला ICC चा दणका

ICC Cricket World Cup 2019 : भारताने अफगाणिस्तानविरुद्ध सामना जिंकला पण पंचांवर नाराजी व्यक्त करणं कर्णधार विराट कोहलीला भोवलं.

  • Share this:

साउथॅम्पटन, 23 जून : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने शेवटच्या षटकात सामना जिंकला. एक चेंडू राखून आणि 11 धावांनी विजय मिळवून भारताने गुणतक्त्यात तिसरे स्थान पटकावले. फलंदाजांनी केलेल्या 224 धावांचा बचाव करताना गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. बुमराह आणि शम्मीच्या भेदक माऱ्यासमोर अफगाणिस्तानचे फलंदाज ढेपाळले. भारताविरुद्धच्या या सामन्यात अफगाणिस्तानला पराभव पत्करावा लागला असला तरी त्यांनी शेवटपर्यंत दिलेल्या लढतीचे सोशल मिडियावर कौतुक होत आहे. भारताने सामना जिंकला असला तरी कर्णधार विराट कोहलीला दंड झाला आहे.

अफगाणिस्तानची फलंदाजी सुरू असताना 29 व्या षटकात बुमराहच्या गोलंदाजीवर अपिल करून पंचांवर दबाव आणल्याबद्दल विराटला दंड करण्यात आला आहे. त्याच षटकात बुमराहने रहमत शाह आणि हशमतुल्लाह शाहिदीला बाद करून सामन्याचं चित्र बदललं. भारताने अफगाणिस्तानच्या फलंदाजाच्या पायचितचे जोरदार अपिल केलं. हे अपिल मैदानावरील पंचांनी फेटाळून लावलं. या निर्णयाविरोधात डीआरएस घेतला. यानंतर तिसऱ्या पंचांनीसुद्धा मैदानावरील पंचांचा निर्णय कायम ठेवला.

दरम्यान अफगाणिस्तानचा संघ फलंदाजी करण्यास मैदानात उतरला असताना तिसऱ्या षटकातसुद्धा मोहम्मद शमीच्या चेंडूवर हजरतुल्लाहच्या पायचितचे अपिल पंचांनी फेटाळून लावलं. अपिल केल्यानंतरही पंच अलीम दार यांनी बाद दिलं नाही. यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने मोहम्मद शमी आणि धोनीसोबत चर्चा केली आणि डीआरएसचा घेतला.

रिव्ह्यूमध्ये चेंडू बॅटला न लागता पॅडवर लागल्याचे दिसत होतं. ज्यावेळी चेंडू स्टम्पच्या रेषेत असल्याचं आणि थोडा बाहेर असल्याचं दिसत होतं. यावर तिसऱ्या पंचांनी जाझईला नाबाद ठरवलं. यामुळे भारताने एक रिव्ह्यू गमावला.

पंचांच्या या निर्णयानंतर कोहलीला राग आला. त्याने पंचांना नाबाद देण्याचं कारण विचारलं. पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत त्याने चेंडू स्टम्पच्या रेषेत असल्याचं सांगितलं. यावेळी कोहली रागात दिसत होता. त्यावेळी तो पुटपुटतानाही दिसला.

विराटने आयसीसीच्या आचरसंहितेचा भंग केल्याबद्दल त्याला दंड ठोठावला आहे. विराटच्या सामन्याच्या मानधनातील 25 टक्के रक्कम कापण्यात आली आहे.

SPECIAL REPORT: पाकिस्तानच्या कर्णधाराची चाहत्यांकडून खिल्ली

First published: June 23, 2019, 3:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading