'मी अडचणीत येऊ शकतो', हिटमॅनचे मुंबई इंडियन्सच्या ट्वीटला उत्तर

'मी अडचणीत येऊ शकतो', हिटमॅनचे मुंबई इंडियन्सच्या ट्वीटला उत्तर

ICC Cricket World Cup 2019 : India vs Pakistan : मुंबई इंडियन्सने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर भारताचा हिटमॅन रोहित शर्माचा पत्नी रितिका आणि मुलीसोबतचा फोटो शेअर केला होता.

  • Share this:

लंडन, 19 जून : ICC Cricket World Cup स्पर्धेत भारताचा हिटमॅन रोहित शर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत तीन सामन्यात 319 धावा केल्या आहेत. रोहितनं पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी करत 140 धावा केल्या होत्या. पाकिस्तानविरुद्धच्या या विजयानंतर रोहित शर्माचे आयपीएलमधील संघ मुंबई इंडियन्सने ट्विटरवरून अभिनंदन केलं आहे. यावेळी मुंबई इंडियन्सने केलेल्या ट्विटला उत्तर देताना रोहितने केलेल्या ट्विटची सध्या चर्चा होत आहे.

मुंबई इंडियन्सने ट्विटमध्ये म्हटलं होतं की, रोहित शर्माने त्याच्या चांगल्या खेळाचं श्रेय मुलगी समायराला दिलं. याला पार्श्वभूमीसुद्धा तशीच आहे. रोहितने पाकविरुद्धच्या सामन्यानंतर म्हटलं होतं की, समायराच्या जन्मानंतर जबाबदारी वाढली आहे. त्याच्या या प्रतिक्रियेचा आधार घेत मुंबई इंडियन्सनं ट्विट केलं होतं.रोहित शर्माने यावर प्रतिक्रिया देताना ट्विट केलं आहे की, मुंबईच्या ट्विटमुळे मी अडचणीत येऊ शकतो. यात आणखी एक व्यक्ती आहे तिला तुम्ही विसरलात. रोहित शर्माला असे सांगायचे होते की, त्या फोटोत पत्नी रितिकासुद्धा आहे. फक्त समायराला श्रेय द्यायच्या नादात आपल्याला पत्नीच्या रागाला सामोरं जावं लागेल आणि काहीतरी वेगळंच व्हायचं असाच काहीसा रोख रोहित शर्माचा होता.यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचा हिटमॅन रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्ध दुसरं शतक झळकावलं. वर्ल्ड कपमधील पहिल्याच सामन्यात त्याने नाबाद 122 धावा करून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवून दिला होता. त्यानतंर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतकी खेळी केली होती. तेव्हा त्याने 70 चेंडूत 57 धावा केल्या होत्या. वर्ल्ड कपमध्ये त्याने दोन शतके आणि एक अर्धशतक केलं आहे.

वाचा- सोनाली बेंद्रेसोबतच्या अफेअरवर शोएबचं स्पष्टीकरण, ती सुंदर पण...

वाचा-पांड्याचा खळबळजनक खुलासा, क्रिकेट आणि मुली नाही तर यात अडकला जीव

वाचा- 'तुमचा राग माझ्यावर काढू नका', वीणानंतर नेटकऱ्यांवर भडकली सानिया

SPECIAL REPORT : कॅट फाईट, वातावरण टाईट ; सानियाने वीणाला सुनावलं


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 19, 2019 07:09 PM IST

ताज्या बातम्या