World Cup : कोण घेणार धोनीची जागा? बांगलादेशविरुद्ध 3 खेळाडू मैदानात

World Cup : कोण घेणार धोनीची जागा? बांगलादेशविरुद्ध 3 खेळाडू मैदानात

ICC Cricket World Cup : भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 3 खेळाडू आहेत जे धोनीची जागा घेऊ शकतात.

  • Share this:

बर्मिंगहम, 02 जुलै : बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताने संघात दोन बदल केले आहेत. केदार जाधवच्या जागी संघात दिनेश कार्तिकला तर कुलदीप यादवच्या जागी भुवनेश्वर कुमारला जागा दिली आहे. या बदलामुळे भारताच्या संघात 4 वेगवान गोलंदाज आणि 4 यष्टीरक्षक आहेत. भारताने इंग्लंडविरुद्धच्या संघात विजय शंकरऐवजी ऋषभ पंतला संधी दिली होती.

भारताला सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी एक विजय हवा आहे. भारताचा बांगलादेशनंतर लंकेशी सामना होणार आहे. आज बांगलादेशवर विजय मिळवून भारत सेमीफायनलचं तिकीट पक्कं करण्याच्या तयारीत असेल. आतापर्यंत 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. एक सामना रद्द झाला तर इंग्लंडविरुद्ध भारताला पराभव पत्करावा लागला. यामुळे 11 गुणांसह भारत गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानी आहे.

भारतीय संघाला दुखापतीने ग्रासलं आहे. आतापर्यंत दोन खेळाडूंना दुखापतीने वर्ल्ड कपला मुकावं लागलं आहे. तर दोन खेळाडू जखमी आहेत. स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असताना ऐनवेळी संघातील खेळाडूंच्या दुखापतीने डोकं वर काढलं आहे. पहिल्यांदा शिखर धवन बाहेर गेला त्याच्या जागी ऋषभ पंत आणि त्यानंतर विजय शंकरच्या जागी मयंक अग्रवालला संघात घेतलं आहे.

भारताच्या संघात आता धोनी यष्टीरक्षक आहे. तर प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये धोनीशिवाय तीन इतर खेळाडू यष्टीरक्षण करतात. यात दिनेश कार्तिकला एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून यष्टीरक्षण करण्याचा अनुभव आहेत. तर ऋषभ पंतने टी20 मध्ये भारतीय संघात आणि आयपीएलमध्ये दिल्लीकडून यष्टीरक्षण केलं आहे. सध्या शिखर धवनच्या जागी सलामीला उतरणाऱ्या केएल राहुलने आयपीएलमध्ये यष्टीरक्षण केलं आहे.

वर्ल्ड कपसाठी संघाची निवड करताना धोनी एखाद्या सामन्यात खेळू शकला नाही तर कार्तिक त्याची जागा घेईल. धोनीचा हा शेवटचा वर्ल्ड कप असेल. त्याच्यानंतर यष्टीरक्षक कोण असा प्रश्न भारतासमोर असणार आहे. त्याची जागा हे कार्तिक, पंत किंवा केएल राहुल घेऊ शकतात. याचीच चाचपणी सुरू नाही ना अशीही चर्चा सोशल मिडियावर रंगली आहे.

दरम्यान भारताच्या मधल्या फळीत भक्कमपणे टिकणाऱ्या फलंदाजाचा शोध सध्या सुरू आहे. भारतासमोर चौथ्या क्रमांकाचा प्रश्न आहे. गेल्या 5 सामन्यात भारताने चार फलंदाज या क्रमांकावर खेळवले. त्यात एकही फलंदाज मोठी खेळी करू शकलेला नाही. आता दिनेश कार्तिकला संघात घेतलं असलं तरी तो केदार जाधवच्या जागी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरेल.

रोहित शर्मा म्हणाला, फक्त धोनीचं काम नाही तर इतरांचीसुद्धा जबाबदारी

World Cup : शंकरची दुखापत संशयाच्या भोवऱ्यात, BCCIनं दिलं कामगिरीचे फळ?

World Cup : शंकर आऊट मयंक इन! रहाणेनं निवृत्ती घेतली का?

SPECIAL REPORT : भगव्या जर्सीमुळे टीम इंडियाचा पराभव?

First published: July 2, 2019, 4:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading