बर्मिंगहम, 30 जून : ICC Cricket World Cup मध्ये भारत आणि यजमान इंग्लंड यांच्यातील लढत सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. सलामीवीर जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी सावध सुरुवात करून दिली आहे. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या जोडीने सर्वाधिक 60 धावांची भागिदारी केली होती. त्यांना मागे टाकून रॉय आणि बेअरस्टो यांनी 22 षटकांत 160 धावांची भक्कम भागिदारी केली. त्याआधी 11 व्या षटकात भारताने जेसन रॉयला बाद करण्याची संधी गमावली.
हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर भारतीय खेळाडूंनी रॉयच्या झेलबादचं अपिल केलं. ते मैदानावरील पंचांनी फेटाळून लावल्यानंतर भारताने डीआरएस घेतला नाही. पांड्याने टाकलेला चेंडू पंचांनी वाइड दिला. त्यावर धोनी आणि इतर खेळाडूंनी अपिलही केलं पण धोनीला खात्री नव्हती. टीव्ही रिव्यूमध्ये चेंडू ग्लोव्हजला घासून गेल्याचं दिसत होतं. त्यामुळं डीआरएस न घेण्याची ही चूक भारताला महागात पडू शकते. सलामीवीरांनी केलेल्या भक्कम भागिदारीच्या जोरावर इंग्लंड भारतासमोर मोठं आव्हान उभा करू शकते.
पांड्याच्या गोलंदाजीवर झेलबादचं अपिल होण्याआधी रॉय 21 धावांवर खेळत होता. त्यानंतर रॉयने 66 धावांची खेळी केली. वर्ल्ड कपच्या पहिल्या पाच सामन्यानंतर गेल्या दोन सामन्यात त्याला दुखापतीने बाहेर बसावं लागलं होतं. जेसन रॉयने वर्ल्ड कपमध्ये 5 सामन्यात 82 च्या सरासरीने 248 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 153 धावांच्या तडाखेबाज खेळीचाही समावेश आहे. त्यानं बांगलादेशविरुद्ध ही खेळी केली होती.
Aleem Dar not easy to spot/hear the edge since ball very slightly brushed the bottom of the glove on the way.
— Charlie Joe (@CharlieJoe4) June 30, 2019
And WHY didnt India review ?! Thats why DRS is there, for such umpiring errors.#CWC19#INDvENG #INDvsENG #ENGvIND #ENGvsIND #TeamIndia #WeAreEngland #OneDay4Children pic.twitter.com/Ob99ISScrz
वेस्ट इंडिज विरोधात 14 जूनला झालेल्या सामन्यात जेसन रॉय जखमी झाला होता. त्यानंतर तो फलंदाजीसाठी उतरला नाही. फिटनेस टेस्ट दरम्यान त्याला नेट्मध्ये फलंदाजी करता आली नाही. त्यामुळं ऑस्ट्रेलियाविरोधातही खेळला नाही. याआधी अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्या विरोधात जेसन खेळू शकला नव्हता.
VIDEO: कंडक्टर मुलीला आंटी म्हणाला आणि बसमध्ये झाला राडा