World Cup : भारताच्या संघात चाललंय काय? आता फक्त एकच उरलाय!

World Cup : भारताच्या संघात चाललंय काय? आता फक्त एकच उरलाय!

ICC Cricket World Cup : सलामीवीर केएल राहुल बाद झाल्यानंतर भारताचे पुढचे 8 फलंदाज फक्त 134 धावांची भर घालून बाद झाले.

  • Share this:

बर्मिंगहम, 02 जुलै : बांगलादेशविरुद्ध भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी 180 धावांची खेळी केली. रोहित शर्माने 104 तर केएल राहुलनं 77 धावांची खेळी करून भारताला भक्कम सुरूवात करून दिली. मात्र, त्यानंतरही भारताचा डाव गडगडला. 1 बाद 180 मध्ये 134 धावांची भर घालण्यासाठी भारताने 8 गडी गमावले. यात पंत, धोनी, कोहली वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. यामुळे पुन्हा भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनंतर मधल्या फळीत भरवशाचा फलंदाज कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच वर्ल्ड कपच्या आधी निवडलेल्या 15 जणांच्या संघातील फक्त एकच खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये घ्यायचा बाकी राहिला आहे.

भारताने बांगलादेशविरुद्ध दिनेश कार्तिकला केदार जाधवच्या जागी संधी दिली. त्याने फक्त 8 धावा केल्या. कार्तिकने 2005 ला भारतीय संघातून पदार्पण केलं होतं. त्यानंतर झालेल्या तीनही वर्ल्ड कपमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्या सात सामन्यात तो प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हता. बांगलादेशविरुद्ध त्याला संघात स्थान देण्यात आलं. मात्र, तो फलंदाजीत फारशी चमक दाखवू शकला नाही.

वर्ल्ड कपमध्ये भारत सर्वात बलाढ्य संघ समजला जात असला तरी काही कमकुवत बाजू आता समोर येत आहेत. त्यामध्ये अफगाणिस्तानसारख्या संघाने फलंदाजांची केलेली दमछाक. तसेच इंग्लंडसमोर धावांसाठी धडपडत असलेली मधली फळी बांगलादेशसमोर गारद झाली. पंत आणि धोनी वगळता इतर फलंदाज फक्त हजेरी लावून गेले. विराट कोहली बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेला पांड्या शून्यावर बाद झाला. पांड्यानंतर धोनी आणि पंतने डाव सावरला पण पंत बाद झाल्यानंतर शेवटच्या सहा षटकांत भारताला 37 धावाच करता आल्या.

गेल्या चार वर्षात चौथ्या क्रमांकावर भारताला एकही भरवशाचा फलंदाज मिळालेला नाही. वर्ल्ड कपमध्येही भारताने केएल राहुल, पांड्या, विजय शंकर आणि रिषभ पंतला खेळवून प्रयोग केला. आता भारताच्या पंधरा खेळाडूंपैकी एकटा जडेजा प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळलेला नाही. बांगलादेशविरुद्ध त्याला संधी द्यायला हवी होती. जडेजा अष्टपैलू खेळाडू असून फलंदाजीसह त्याची गोलंदाजी संघाला उपयुक्त ठरली असती.

मधल्या फळीची चिंता

वर्ल्ड कपमध्ये आठ पैकी 7 सामन्यात भारताने चौथ्या क्रमांकावर चार खेळाडूंना खेळवलं आहे. यात एकदा केएल राहुल, हार्दिक पांड्या, पंत खेळले आहेत. तर दोन वेळा विजय शंकर खेळला आहे. आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर बांगलादेशविरुद्ध पंतने 48 धावांची केलेली खेळी वगळता इतर सामन्यात निराशाच पदरी पडली.

भारताने इंग्लंडविरुद्धचा सामना वगळता इतर सामने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. भारताला अफगाणिस्तानने जबरदस्त झुंज दिली. स्पर्धेत भारताच्या गोलंदाजांनी आणि आघाडीच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली असली तरी मधल्या फळीची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

विजय शंकर बाहेर

सलामीवीर शिखर धवन स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर पंतला इंग्लंडमध्ये बोलावून घेण्यात आलं. धवनच्या जागी संघात विजय शंकरची वर्णी लागली. मात्र, त्याला फलंदाजीत चमक दाखवता आली नाही. तसेच पाकिस्तानविरुद्ध वगळता शंकरला गोलंदाजीसुद्धा दिली नाही. तेव्हा त्याच्या कामगिरीवरून शंकर म्हणजे कोहलीसारखा गोलंदाज आणि बुमराहसारखा फलंदाज अशी टीका नेटकऱ्यांनी केली होती.

आता विजय शंकरच दुखापतीने वर्ल्ड कपमधून बाहेर गेला आहे. विजयच्या जागी ऋषभ पंतला अंतिम 11 मध्ये घेतलं गेलं. इंग्लंडविरुद्ध त्याने वर्ल्ड कपमधील पदार्पणाच्या सामन्यात 29 चेंडूत 32 धावा केल्या. त्यानंतर बांगलादेशविरुद्द 48 धावा करून पहिल्या सामन्यानंतर टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं.

जडेजाला संधी नाहीच

जडेजाला आतापर्यंत दुसऱ्यांदा बदली खेळाडू म्हणून क्षेत्ररक्षणाची संधी मिळाली आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध भुवनेश्वर कुमार बाहेर गेल्यानंतर क्षेत्ररक्षण केलं होतं.त्यानंतर इंग्लंडच्या सलामीच्या जोडीने भारताच्या गोलंदाजांना एकही संधीच दिली नव्हती. दरम्यान, केएल राहुलला क्षेत्ररक्षण करताना पाठीला दुखापत लागल्यानं अर्ध्यातून मैदान सोडावं लागलं. त्यानंतर त्याच्या जागी रविंद्र जडेजा मैदानात आला. त्यानेच जेसन रॉयचा अप्रतिम झेल घेतला होता.

वर्ल्ड कपमध्ये 15 जणांच्या संघात निवड झालेल्यांपैकी फक्त जडेजाला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेलं नाही. तो गोलंदाजीसह फलंदाजीसुद्धा करू शकतो. सध्या संघात हार्दिक पांड्या अष्टपैलू खेळाडू आहे. इंग्लंडविरुद्ध विजय शंकरला विश्रांती देण्यात आली आहे. जडेजा अष्टपैलू असताना त्याला संघात घेतला नाही. तरीही बदली खेळाडू म्हणून क्षेत्ररक्षणात कमाल केली आहे. मास्टर ब्लास्टर सचिननंसुद्धा जडेजाला संघात घ्यावं असा सल्ला दिला होता.

World Cup : केदार जाधवच्या जागी जडेजाला संघात घ्यावं, सचिनचा सल्ला

रोहित शर्मा म्हणाला, फक्त धोनीचं काम नाही तर इतरांचीसुद्धा जबाबदारी

World Cup : शंकरची दुखापत संशयाच्या भोवऱ्यात, BCCIनं दिलं कामगिरीचे फळ?

World Cup : शंकर आऊट मयंक इन! रहाणेनं निवृत्ती घेतली का?

SPECIAL REPORT : भगव्या जर्सीमुळे टीम इंडियाचा पराभव?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 2, 2019 08:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading