फक्त धोनीच नाही भारताच्या निम्म्या संघासाठी हा शेवटचा वर्ल्ड कप?

ICC Cricket World Cup : भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीच्या निवृ्त्तीची सध्या चर्चा सुरू आहे पण त्याच्याशिवाय संघात असेही काही खेळाडू आहेत ज्यांचा हा अखेरचा वर्ल्ड कप ठरू शकतो.

  • Share this:

ICC Cricket World Cup मध्ये बलाढ्य समजल्या जाणाऱ्या भारताला सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला. मँचेस्टरवर झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारतावर 18 धावांनी विजय मिळवला. त्यांनी सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक मारली. भारताच्या पराभवानंतर त्याची कारणं, जबाबदार कोण अशी चर्चा होत आहे. यातच धोनीच्या निवृत्तीबद्दलही विचारणा केली जात आहे. धोनीचे वय आता 38 असून हा त्याचा अखेरचा वर्ल्ड कप आहे. पण त्याच्याशिवाय आणखी काही खेळाडूंसाठी हा वर्ल्ड कप अखेरचा ठरू शकतो.

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार राहिलेल्या धोनीच्या नेतृत्वाखाली 2007 टी20 आणि 2011 चा वर्ल्ड कप जिंकून दिला. आता तो 38 वर्षांचा असून 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये तो खेळणार नाही. धोनीने इंग्लंडवरून भारतात परतल्यानंतर निवृत्ती जाहीर केली तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नसेल.

धोनीनंतर भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकचा सुद्धा हा अखेरचा वर्ल्ड कप असू शकतो. पुढच्या वर्ल्ड कपला कार्तिकचे वय 38 पेक्षा जास्त असेल. तसेच सध्या पंत आणि इतर नवोदीत खेळाडू पाहता कार्तिकला 2023 च्या संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे.

2019 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा सलामीवीर शिखर धवन फक्त दोन सामनेच खेळू शकला. दुखापतीने त्याला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. त्यानं एक शतकही केलं होतं. सध्या 34 वय असलेल्या धवनला दुखापतीचा सामना करत पुढची चार वर्षे कामगिरीत सातत्य राखावं लागेल. यात त्याला यश आलं तरच तो 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये दिसू शकेल.

भारताचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधवचा हा अखेरचा वर्ल्ड कप ठरू शकतो. सध्या त्याचं वय 34 असून 2023 मध्ये तो 38 वर्षांचा होईल. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये त्याच्याकडून अपेक्षा होत्या पण 6 सामन्यात त्याला 80 धावाच करता आल्या. तर गोलंदाजीत एकही विकेट घेता आलेली नाही. त्यामुळे केदार जाधवला संधी मिळण्याची शक्यता धूसर आहे.

वय आणि सध्याचा फॉर्म यानुसार धोनी, कार्तिक, केदार जाधव पुढच्या वर्ल्ड कपमध्ये असण्याची शक्यत नाही. तर धवनला दुखापत आणि फॉर्म या दोन्ही गोष्टी सांभाळाव्या लागतील. दरम्यान, फुल्ल फॉर्ममध्ये असलेल्या 28 वर्षीय शमीलासुद्धा 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये खेळणं कठीण होऊ शकतं. 2023 ला शमी 32 वर्षांचा असेल पण वेगवान गोलंदाजांना त्यांचा फिटनेस राखण्याचं आव्हान असतं त्यावरच शमीचं पुढच्या वर्ल्ड कपमध्ये खेळणं अवलंबून आहे.

सेमीफायनलमध्ये अष्टपैलू खेळी करून सर्वांची मने जिंकणाऱ्या जडेजाला पुढच्या वर्ल्ड कपमध्ये संधी मिळेल का? याबद्दल सांशकता व्यक्त केली जात आहे. सध्या जडेजा 30 वर्षांचा असला तरी संघात त्याचे स्थान पक्के नाही. यंदाच्या वर्ल्ड कपमध्येही त्याला अखेरच्या दोन सामन्यांसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतलं होतं. त्याने संघात स्थान पक्कं केलं तर निश्चितच तो 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये खेळू शकतो पण त्यासाठी संधी मिळण्याची गरज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 11, 2019 07:53 PM IST

ताज्या बातम्या