World Cup : IND vs ENG क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच एका सामन्यावर 165 कोटी लोकांची नजर! India vs England | India | England | ICC world cup 2019

World Cup : IND vs ENG क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच एका सामन्यावर 165 कोटी लोकांची नजर! India vs England | India | England | ICC world cup 2019

World Cup : IND vs ENG विरुद्ध सामन्यावर पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही देशांची नजर असणार आहे.

  • Share this:

बर्मिंगहॅम, 30 जून: ICC Cricket World Cupमध्ये आज रविवारी होणाऱ्या भारत (India) विरुद्ध इंग्लंड (England) सामन्यासाठी दोन्ही संघ विजयाच्या निश्चियाने मैदानात उतरतील. इंग्लंडसाठी सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. त्यांचे केवळ दोनच सामने शिल्लक आहेत. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून सेमीफायनलसाठीची जागा निश्चित करण्याचा इंग्लंडचा प्रयत्न असेल. तर भारतीय संघाचे 3 सामने शिल्लक आहेत. सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारतीय संघाला एक विजय पुरेसा आहे. असे असले तरी या दोन्ही संघांशिवाय अन्य दोन संघ आहेत ज्यांची भारत-इंग्लंड लढतीवर नजर आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना केवळ भारत आणि इंग्लंडचे चाहते पाहणार नाहीत. तर पाकिस्तान आणि बांगलादेशमधील क्रिकेट चाहते देखील हा सामना डोळ्यात तेल घालून पाहतील. भारताच्या विजयात पाकिस्तान आणि बांगलादेशचे स्पर्धेतील भविष्य ठरणार आहे. भारताने इंग्लंडचा पराभव केल्यास पाक आणि बांगलादेशचे सेमीफायनलमध्ये जाण्याच्या आशा शिल्लक राहतील.

World Cup: भारत सेमीफायनलमध्ये जाणार की इंग्लंड इतिहास बदलणार!

गुणतक्त्यात 14 गुणांसह ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी आहे. भारत 11 गुणांसह दुसऱ्या तर न्यूझीलंड 11 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानने अफगाणस्तानवर विजय मिळवल्यामुळे ते 9 गुणांसह चौथ्या स्थानावर आहेत. तर स्पर्धेत पहिल्यापासून दमदार कामगिरी करणारा इंग्लंड 8 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. बांगलादेश 7 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.

भारताने जर इंग्लंडचा पराभव केल्यास त्यांचे सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा संपुष्ठात येतील. अशा परिस्थितीत पाकिस्तानला पुढील सामन्यात विजय मिळून 11 गुणांसह सेमीफायनल गाठता येईल. बांगलादेशचे अद्याप दोन सामने शिल्लक आहेत. यातील पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध तर दुसरा सामना भारताविरुद्ध आहे. हे दोन्ही सामना जिंकल्यास त्यांचे 11 गुण होतील आणि ते सेमीफायनलमध्ये जागा निश्चित करु शकतील.

क्रिकेटच्या इतिहासात कदाचित प्रथमत 130 कोटी भारतीयांसोबत 20 कोटी पाकिस्तानी आणि 15 कोटी बांगलादेशी विराटसेनेच्या विजयासाठी प्रार्थना करतील.

World Cup: पाकच्या विजयानंतर मैदानात चाहत्यांचा राडा; खेळाडूंनाही सोडलं नाही!

सध्या गुणतक्ता पाहिल्यास ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझीलंड यांचे सेमीफायनलमधील स्थान जवळ जवळ निश्चित आहे. आता स्पर्धा आहे ती चौथ्या स्थानासाठी आणि यासाठी इंग्लंड, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात चुरस आहे.

ब्रेकअपचा बदला, प्रेयसीवर केले 12 वार आणि स्वत:चाही चिरला गळा!

First published: June 30, 2019, 11:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading