World Cup : भुवी फिट झाल्यानं विराटसमोर प्रश्न, आता काय करायचं?

World Cup : भुवी फिट झाल्यानं विराटसमोर प्रश्न, आता काय करायचं?

ICC Cricket World Cup : भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार फिट झाला असून वेस्ट इंडिजविरुद्ध तो मैदानात उतरण्यास तयार आहे.

  • Share this:

लंडन, 25 जून : ICC Cricket World Cup मध्ये भारताचा 27 जूनला वेस्ट इंडिजशी सामना होणार आहे. भारतासाठी लवकर सेमिफायनलचं तिकीट मिळवण्यासाठी हा विजय गरजेचा आहे. मँचेस्टरमध्ये होणाऱ्या या सामन्यापूर्वी भारताचा अंतिम अकरा जणांचा संघ निवडताना विराटसमोर मोठा प्रश्न उभा राहणार आहे. भारताच्या दोन गोलंदाजांपैकी एकाची निवड त्याला करावी लागणार आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे मागच्या सामन्यात खेळू शकला नव्हता. तो आता फिट झाला असून पुढच्या सामन्यासाठी तयार आहे. भुवनेश्वर बाहेर गेल्यानं संघात शमीला घेण्यात आलं होतं. आता भुवनेश्वरला पुन्हा संघात घ्याय़चं असेल तर शमीला बाहेर जावं लागेल. त्यामुळे शमीला बाहेर बसवायचं की भुवनेश्वरला असा पेच कर्णधार विराट कोहलीसमोर आहे.

भारताच्या गोलंदाजांनी वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली आहे. भुवनेश्वर कुमारने तीन सामन्यात 5 विकेट घेतल्या आहेत. तर शमीने पहिल्याच सामन्यात हॅट्ट्रिक घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. यामुळे प्लेइंग इलेव्हन ठरवताना विराटची डोकेदुखी वाढली आहे. सध्या बुमराह, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार हे चौघे संघात आहेत. शिखर धवनच्या जागी विजय शंकरला संघात घेतल्यानंतर तो पाचवा गोलंदाज आहे. तर हार्दिक पांड्यानेसुद्धा गोलंदाजी केली आहे. अफगाणिस्तानविरुद्ध भुवनेश्वरला दुखापतीने उतरता आले नाही. त्याच्याजागी खेळणाऱ्या मोहम्मद शमीने वर्ल्ड कपमधील पदार्पणाच्या सामन्यात हॅट्ट्रिक घेतली शमीच्या या जबरदस्त कामगिरीने अंतिम अकरा जणांची निवड करणं कठीण झालं आहे.

दरम्यान, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वेस्ट इंडिजविरुद्ध भुवनेश्वरला संधी द्यायला हवी असं म्हटलं होतं. भुवनेश्वर कुमार ख्रिस गेलला रोखू शकतो. गेलसारखा स्फोटक फलंदाज धोकादायक आहे. मात्र, दुसरीकडे भुवनेश्वर कुमार सेमिफायनलच्या सामन्यात एकदम फिट रहावा आणि उपलब्ध व्हावा यासाठी त्याला विश्रांती दिली जाऊ शकते.

अफगाणिस्तानविरुद्धची शमीची कामगिरी पाहता शमीला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवायचं का असा प्रश्न विराटसमोर असेल. भारताने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानला पराभूत केलं आहे. न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसाने रद्द झाला. भारताचे उर्वरित सामने वेस्ट इंडिज, बांगलादेश, इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्ध आहेत.

वाचा- World Cup Point Table : बांगलादेश ठरणार जायंट किलर, भारतालाही धोका

वाचा- World Cup: 'भारताकडून पराभव झाल्यानंतर आत्महत्या करावी वाटली'

वाचा-अर्जुन तेंडुलकर वर्ल्ड कपमध्ये करतोय इंग्लंडला मदत, 'हे' आहे कारण

बेस्टला अच्छे दिन येणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

First published: June 25, 2019, 10:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading