World Cup : जडेजानं विकेट घेतल्यावर मांजरेकरांची कमेंट, पुन्हा होत आहेत ट्रोल!

World Cup : जडेजानं विकेट घेतल्यावर मांजरेकरांची कमेंट, पुन्हा होत आहेत ट्रोल!

ICC Cricket World Cup स्पर्धेत समालोचन करताना मांजरेकर त्यांच्या वक्तव्याने अनेकदा ट्रोल झाले आहेत. त्यांना जड़ेजाने ट्विटरवरून उत्तर दिलं होतं.

  • Share this:

हेडिंग्ले, 06 जुलै : ICC Cricket World Cup मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात भारताच्या गोलंदाजीसमोर लंकेचा डाव गडगडला. सलामीवीरांना बुमराहने माघारी धाडलं. त्यानंतर रविंद्र जडेजानं त्याच्या पहिल्याच षटकात विकेट घेतली. सामन्याच्या 11 व्या षटकातील चौथ्या चेंडुवर जडेजाने कुसल मेंडिसला बाद केले. जडेजाच्या गोलंदाजीवर पुढे येऊन खेळण्याच्या नादात कुशल मेंडिसला महेंद्रसिंग धोनीने यष्टीचित केलं. यावेळी मांजरेकरांनी पुन्हा समालोचन करताना टेलर मेड पिच फॉर जडेजा असं म्हटल्यानं त्यांना ट्रोल केलं जात आहे. जडेजाच्या गोलंदाजीचं कौतुक न करता त्यांनी खेळपट्टी जडेजासाठी चांगली होती असं म्हटल्यानं त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे. याआधी जड़ेजाने त्यांना ट्विटरवर उत्तर दिलं होतं.

वर्ल्ड कपमध्ये जडेजाला पहिल्यांदाच प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. मोहम्मद शमीच्या जागी जडेजाला संधी देण्यात आली. जडेजाला आतापर्यंत दोन वेळा बदली खेळाडू म्हणून क्षेत्ररक्षणाची संधी मिळाली आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध भुवनेश्वर कुमार बाहेर गेल्यानंतर क्षेत्ररक्षण केलं होतं.त्यानंतर इंग्लंडच्या सलामीच्या जोडीने भारताच्या गोलंदाजांना एकही संधीच दिली नव्हती. दरम्यान, केएल राहुलला क्षेत्ररक्षण करताना पाठीला दुखापत लागल्यानं अर्ध्यातून मैदान सोडावं लागलं. त्यानंतर त्याच्या जागी रविंद्र जडेजा मैदानात आला. त्यानेच जेसन रॉयचा अप्रतिम झेल घेतला होता.

वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून संजय मांजरेकर स्वत:च्या वक्तव्यामुळे अडचणीत येत आहेत. आतापर्यंत त्यांनी केलेल्या अनेक वक्तव्यांवर चाहत्यांनी टीका केली आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात चाहत्यांनी मांजरेकरांना समालोचन करण्यापासून हटवण्याची मागणी केली होती.

केवळ जडेजाच नाही तर महेंद्र सिंग धोनीवर देखील केलेल्या वक्तव्यावर अनेक युझर्स नाराज आहेत. धोनीच्या विरुद्ध बोलल्यामुळे चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

संजय मांजरेकर यांनी केलेल्या वक्तव्याला उत्तर देताना जडेजाने ट्विटवर लिहले होतं की, "मी तुमच्या पेक्षा दुप्पट सामने खेळले आहेत आणि अजून देखील खेळत आहे. दुसऱ्या व्यक्तीने जे कमवले आहे त्याचा आदर करायला शिका. मी तुमची फालतू बडबड खुप ऐकूण घेतली आहे."

VIDEO: धोनीला पाहायचंय? या ठाण्याच्या मॉलमध्ये!

First published: July 6, 2019, 4:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading