PAKvsBAN : इमामनं इतिहास रचला पण नकोसा विक्रमही झाला नावावर!

PAKvsBAN : इमामनं इतिहास रचला पण नकोसा विक्रमही झाला नावावर!

ICC Cricket World Cup : PAK vs BAN : पाकिस्तानचा फलंदाज इमाम उल हकने शतकी खेळी करून संघाला आव्हानात्मक धावसंख्या करून दिली.

  • Share this:

लंडन, 05 जुलै : पाकिस्तानचा सलामीवीर बाबर आझमने इमाम उल हकसोबत बांगलादेशविरुद्ध चांगली सुरूवात करून दिली. बाबर आझमचे शतक 4 धावांनी हुकले. तर इमाम उल हकने शतक साजरं केलं. या दोघांच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानने बांगलादेशसमोर 315 धावांचे आव्हान उभा केलं. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शतक करून पदार्पणाच्या वर्ल्ड कपमधील पहिलं वहिलं शतक केलं आहे. आपल्या पहिल्याच वर्ल्ड कपमध्ये लॉर्ड्सवर शतक करणारा तो पाकिस्तानचा पहिलाच फलंदाज आहे. तर पाकिस्तानकडून वर्ल्ड कपमध्ये शतक करणारा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे.

इमाम उल हक 23 व्या वर्षी पहिला वर्ल्ड कप खेळत आहे. या वर्ल्ड कपमध्ये अखेरच्या सामन्यात त्यानं शतक केलं. त्याच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील हे सातवं शतक आहे. इमामनं 99 चेंडूत शतक केलं. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानकडून हे दुसरं शतक आहे. याआधी बाबर आझमने शतक केलं होतं.

इमामनं शतक केलं पण तो लगेच हिटविकेट बाद झाला. यामुळे नको असलेला विक्रमही त्याच्या नावावर झाला. 42 व्या षटकात मुस्तफिझुरच्या शेवटच्या चेंडूवर मागे जाऊन खेळण्याच्या प्रयत्नात इमाम उल हकचा पाय स्टम्पला लागला आणि तो हिटविकेट बाद झाला.

वर्ल्ड कपच्या इतिहासात हिट विकेट बाद होणारा तो दुसरा पाकिस्तानी आणि एकूण 11 वा खेळाडू ठरला आहे. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये अशा पद्धतीने बाद होणारा इमाम दुसरा खेळाडू आहे. त्याच्या अगोदर न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टिल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हिट विकेट बाद झाला होता.

बाबर आझमचे शतक हुकले पण केला विक्रम

बाबर आझम एका वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने जावेद मियाँदादला मागे टाकलं. मियाँदादने 1992 च्या वर्ल्ड कपमध्ये 437 धावा केल्या होत्या तर बाबर आझमने 465 धावा केल्या आहेत.

World Cup : श्रीलंकेविरोधात बुमराह खेळण्याची शक्यता कमी, कोण घेणार जागा?

World Cup: भर मैदानात निर्वस्त्र शिरला चाहता, सामन्यात घातला धिंगाणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 5, 2019 07:43 PM IST

ताज्या बातम्या