World Cup : डॉक्टरांनी सांगितलं नको खेळू, पण आईसाठी मैदानावर झुंज देत राहिला हा फलंदाज!

ICC Cricket World Cup 2019 : इंग्लंडविरुद्ध खेळताना अफगाणिस्तानच्या शाहिदीच्या डोक्यावर मार्क वूडचा उसळता चेंडू इतक्या जोरात आदळला की त्याचे हेल्मेट तुटले.

News18 Lokmat | Updated On: Jun 19, 2019 04:11 PM IST

World Cup : डॉक्टरांनी सांगितलं नको खेळू, पण आईसाठी मैदानावर झुंज देत राहिला हा फलंदाज!

मँचेस्टर, 19 जून : क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा खेळाडू जखमी होतात. वेदना होत असतानाही खेळत राहतात. ICC Cricket World Cup मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानचा खेळाडू जखमी झाला होता. जखमी झाल्यानंतर त्याला डॉक्टरांनी न खेळण्याचा सल्ला दिला होता. मात्र, आईसाठी त्याने आपल्या जखमेच्या वेदना सहन केल्या आणि बाद होईपर्यंत खेळला.

इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात मंगळवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडने 150 धावांनी दणदणीत विजय साजरा केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनच्या खेळीच्या जोरावर 50 षटकांत 6 बाद 397 धावा केल्या. मॉर्गनने 71 चेंडूत 148 धावांची तुफान खेळी केली. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल खेळताना अफगाणिस्तानला 8 बाद 247 धावाच करता आल्या.

अफगाणिस्तानकडून सर्वाधिक धावा हशमतुल्लाह शाहिदीने केल्या. तो फलंदाजी करत असताना मार्क वूडच्या गोलंदाजीवर उसळता चेंडू हेल्मेटवर आदळला. यामुळे हशमतुल्लाह शाहिदी मैदानावर कोसळला. त्यानंतर शाहिदी लगेच उठून उभा राहिला आणि फलंदाजीला तयार झाला. यावेळी सगळेच आश्चर्यचकीत झाले. इतक्या वेगाने चेंडू लागल्यानंतरही तो सहजपणे कसा काय तयार झाला. याबाबत शाहिदीने स्वत: याबाबत खुलासा केला आहे.

मार्क वूडच्या गोलंदाजीवर चेंडू लागल्यानंतर शाहिदी मैदानावर कोसळला. तेव्हा आयसीसीच्या डॉक्टरांनी त्वरीत मैदानावर धाव घेतली. डॉक्टरांनी चेकअप करून त्याला फलंदाजी न करण्याचा सल्ला दिला. पण शाहिदीने त्यांना आपण मैदान सोडणार नसल्याचं सांगितलं. त्यावेळी हेल्मेट तुटलं असतानाही शाहिदीने खेळण्याचा निर्णय घेतला. शाहिदी म्हणाला की, अशा वेळी मी संघाला सोडू शकत नाही. माझे संपूर्ण कुटुंबीय सामना बघत होते. मी जर मैदान सोडलं असतं तर माझी काळजी करत बसले असते. मला ते नको होतं.

अफगाणिस्तानच्या संघ व्यवस्थापनातील एका सदस्याने सांगितलं की, डॉक्टरांनी शाहिदीला मैदान सोडण्यास सांगितलं होतं. मात्र, त्याने मी ठीक असून फलंदाजी सुरूच ठेवणार असल्याचं सांगितलं. हशमतुल्लाहने या सामन्यात 76 धावांची खेळी केली.

Loading...

सामन्यानंतर शाहिदीने म्हटलं की, आई माझी काळजी करत असते. गेल्या वर्षी वडिलांचे निधन झाले. त्यामुळे आता तिला आणखी दुखवायचे नाही. यासाठी मी चेंडू लागल्यानंतरही खेळत राहण्याचा निर्णय घेतला.

वाचा- सोनाली बेंद्रेसोबतच्या अफेअरवर शोएबचं स्पष्टीकरण, ती सुंदर पण...

वाचा-पांड्याचा खळबळजनक खुलासा, क्रिकेट आणि मुली नाही तर यात अडकला जीव

वाचा- 'तुमचा राग माझ्यावर काढू नका', वीणानंतर नेटकऱ्यांवर भडकली सानिया


SPECIAL REPORT : कॅट फाईट, वातावरण टाईट ; सानियाने वीणाला सुनावलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 19, 2019 04:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...