विराट नको रोहितकडे द्या नेतृत्व, भारताच्या क्रिकेटपटूची मागणी!

विराट नको रोहितकडे द्या नेतृत्व, भारताच्या क्रिकेटपटूची मागणी!

भारताला वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलमध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर आतापर्यंत संघात प्रशिक्षकांसह कर्णधारही बदलण्याची मागणी चाहत्यांकडून होत होती.

  • Share this:

मुंबई, 13 जुलै : ICC Cricket World Cup मधून बाहेर पडल्यानंतर भारतीय संघाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. यात संघातील मधल्या फळीत खेळणाऱ्या फलंदाजांसह प्रशिक्षक आणि नेतृत्व बदलाची चर्चा होत आहे. आता भारताचा क्रिकेटपटू वासीम जाफरने एकदिवसीय आणि टी20 क्रिकेटच्या कर्णधारपदावरून विराटला हटवण्यात यावं असं म्हटलं आहे. विराटच्या जागी रोहित शर्माकडे ही जबाबदारी सोपवावी असं जाफरने म्हटलं आहे. भारतीय संघाच्या नेतृत्व बदलावर उघडपणे बोलणारा जाफऱ पहिलाच क्रिकेटपटू आहे. याशिवाय अनेक चाहत्यांनी अशी मागणी केली होती.

वासिम जाफरने म्हटलं आहे की, मर्यादीत षटकांच्या क्रिकेटची जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवण्याची वेळ आली आहे का? मला वाटतं की त्यानं 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताचं नेतृत्व करावं असंही जाफरने ट्विटमध्ये म्हटंल आहे. भारताचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आल्यानंतर कोहलीच्या नेतृत्वावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केला. विराटऐवजी रोहित शर्माला ही जबाबदारी द्यावी असं चाहत्यांनी म्हटलं आहे. तो चांगला कर्णधार होऊ शकतो. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने आशिया कप जिंकला होता.

वर्ल्ड कपमध्ये भारत जेतेपदाचा प्रबळ दावेदार समजलं जात होतं. मात्र, सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून भारताला 18 धावांनी पराभूत व्हावं लागलं. गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर असलेल्या भारताला चौथ्या स्थानावरील न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला.

सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवानंतर भारतीय संघात दोन गट पडल्याचे वृत्त समोर येत आहे. सेमीफायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर संघातील एक गट आहे जो एकमेकांवर पराभवाचे खापर फोडत आहेत तर काही जण पराभवासाठी कोट रवी शास्त्री यांना जबाबदार धरत आहेत. काही जण कर्णधार विराट कोहलीवर नाराज आहेत.

भारतीय संघाच्या पराभवानंतर सेमीफायनलमध्ये झालेल्या चुकांवर अनेकांनी टीका देखील केली. आता विविध प्रसारमाध्यमांमध्ये झालेल्या वृत्तानुसार संघातील सर्व निर्णय विराट आणि कोच शास्त्रीच घेतात. हे दोघे संघातील अन्य कोणत्याही सदस्यासोबत चर्चा करत नाहीत. दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार यामुळेच कोच आणि कर्णधार यांना कोणीही विरोध करत नाही. काही खेळाडूंच्या मते भारतीय संघ वर्ल्ड कपमधून बाहेर पडला याला शास्त्री आणि विराट यांचा एका बाजूने विचार करण्याचा स्वभाव जबाबदार आहे. हे दोघे प्रत्येक निर्णय संघावर लादतात असे काहींचे म्हणणे आहे.

ऑपरेशन लोटसचं पुढचं टारगेट आता मध्य प्रदेश आणि राजस्थान?

First published: July 13, 2019, 7:10 PM IST

ताज्या बातम्या