World Cup फायनल न्यूझीलंड आणि इंग्लंडमध्ये पण नजर सचिनच्या विक्रमावर!

ICC Cricket World Cup मध्ये न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात सामना सुरू आहे.

  • Share this:

ICC Cricket World Cup मध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना सुरू आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंडला आतापर्यंत एकदाही वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. त्यामुळं दोन्हीपैकी कोणीही जिंकलं तरी क्रिकेटला नवा जग्गजेता मिळणार आहे.

वर्ल्ड कप स्पर्धेत आजच्या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंकडे विक्रम करण्याची संधी आहे. इंग्लंडच्या जो रूटला आणि न्यूझीलंडच्या केन विल्यम्सनला मास्टर ब्लास्टर सचिनचा 673 धावांचा विक्रम मोडण्यासाठी 124 धावांची गरज आहे.

इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनला ख्रिस गेलचा एका वर्ल्ड कपमधील सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडता येईल. गेलच्या नावावर 26 षटकार असून मॉर्गनला त्यासाठी 4 षटकारांची गरज आहे.

न्यूझीलंडचा यष्टीरक्षक टॉम लॅथमला ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक अॅडम गिलख्रिस्टचा विक्रम मोडण्याची संधी आहे. गिलख्रिस्टने वर्ल्ड़ कपमध्ये 21 जणांना बाद केलं आहे. त्याला मागे टाकण्यासाठी लॅथमने 3 जणांना बाद करण्याची गरज आहे.

इंग्लंड चौथ्यांदा वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहचले आहे. याआधी ते 1979, 1987 आणि 1992 ला अंतिम सामन्यात पराभूत झाले होते. न्यूझीलंड यावेळी सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहचले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 14, 2019 03:55 PM IST

ताज्या बातम्या