World Cup : पंचांच्या दोन चुकांचा दणका, न्यूझीलंडचे स्वप्न भंगणार?

World Cup : पंचांच्या दोन चुकांचा दणका, न्यूझीलंडचे स्वप्न भंगणार?

World Cup मध्ये अंतिम सामन्यात पंचांच्या दोन चुकांचा न्यूझीलंडला फटका बसू शकतो.

  • Share this:

लॉर्ड्स, 14 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये अंतिम सामन्यात न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात सामना सुरू आहे. यामध्ये न्यूझीलंडला पंचांच्या दोन चुकांचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. फलंदाजीवेळी एक आणि गोलंदाजीवेळी एक असे दोन चुकीचे निर्णय पंचांनी दिले. यात न्यूझीलंडच्या विरुद्ध निर्णय दिल्यानं याचा फटका त्यांना बसू शकतो.

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 50 षटकांत 8 बाद 241 धावा केल्या. दरम्यान 34 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर न्यूझीलंडचा फलंदाज पायचित झाला. मार्क वूडने पहिल्याच चेंडूवर पायचितचे जोरदार अपिल केलं. यात पंचांनी त्याला बाद दिलं. यावर न्यूझीलंडने डीआरएस घेतला नाही. त्यानंतर टीव्ही रिप्लेमध्ये चेंडू स्टम्पवरून जात असल्याचं दिसलं.

रॉस टेलर बाद होण्यापूर्वी संघाची अवस्था 33 षटकांत 3 बाद 140 होती. त्यानंतर ती 4 बाद 140 झाली. जर रॉस टेलर बाद झाला नसता तर न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारता आली असती.

फलंदाजीनंतर क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडने पहिल्याच चेंडूवर डीआरएस घेतला. मात्र, यातही पंचांचा निर्णय कायम ठेवण्यात आला. इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय पहिल्याच चेंडूवर पायचित झाला असता. मात्र, त्याचे अपिल पंचांनी फेटाळून लावले. रिव्ह्यूमध्ये चेंडू स्टम्पवर आदळत असल्याचे दिसत होते मात्र पंचांचा निर्णय कायम ठेवण्यात आला. याचा फायदा इंग्लंडला झाला. या संधीचा जास्त फायदा इंग्लंडला झाला नाही. जेसन रॉय सहाव्या षटकात झेलबाद झाला.

ब्रम्हगिरी पर्वतावरील नयनरम्य दृश्य, पाहा हा EXCLUSIVE VIDEO

First published: July 14, 2019, 8:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading