लॉर्ड्स, 17 जुलै : ICC Cricket World Cup मध्ये अंतिम सामन्यात सुपर ओव्हरमध्ये विजेता ठरला. त्यातही सामना टाय झाला मात्र, सुपर ओव्हरच्या नियमानुसार इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आलं. चौकार-षटकारांच्या जोरावर न्यूझीलंडला मागे टाकून इंग्लंडनं बाजी मारली. त्याआधी 50 षटकांमध्ये सामना जिंकण्याची संधी न्यूझीलंडला होती. एका ओव्हर थ्रोमुळं सामना न्यूझीलंडच्या हातातून निसटला. असे असले तरीही ओव्हर थ्रोवरूनही आता वाद निर्माण झाला आहे.
अंतिम सामन्यात शेवटच्या षटकात तीन चेंडूत इंग्लंडला 9 धावांची गरज होती. तेव्हा डीप मिडविकेटवरून गुप्टिलनं केलेला थ्रो बेन स्टोक्सच्या बॅटला लागून चौकार गेला. त्यानंतर पंच कुमार धर्मसेना यांनी दुसरे पंच इरासमुस यांच्याशी चर्चा करत, इंग्लंडला सहा धावा दिल्या. यात दोन धावा खेळाडूंनी धावत काढल्या तर, चार धावा ओव्हरथ्रोच्या मिळाल्या. या सहा धावांमुळं 242 धावांचा पाठलाग करणारा इंग्लंड 241 धावा करू शकला. त्यामुळं हा सामना टाय झाला.
ओव्हर थ्रोच्या धावा देताना पंचांकडून चुक झाल्याचं माजी आंतरराष्ट्रीय पंच सायमन टफेल यांनीही म्हटलं. ओव्हर थ्रोवर सहा धावा नाही तर पाच धावाच द्यायला हव्या होत्या असंही स्पष्ट केलं. टफेल यांच्या या वक्तव्यानंतर क्रिकेट प्रेमींनी आयसीसीनं पुन्हा विचार करावा आणि अजुनही वेळ गेलेली नाही असं म्हटलं आहे.
आयसीसीकडून याबाबत प्रतिक्रिया देण्यात आली आहे. आयसीसीच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे की, पंचांच्या कोणत्याही निर्णयावर कमेंट करणं हे नियमाच्या विरुद्ध आहे. पंच मैदानावर नियमानुसार निर्णय घेतात आणि त्यावर आम्ही कोणतीही कमेंट करू शकत नाही.
भारताचा प्रशिक्षक कसा हवा? BCCI ने घातल्या 'या' अटी
ओव्हर थ्रोसाठी आयसीसीनं दिलेल्या 19.8 नियमानुसार जर क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूमुळं जर चेंडू सीमापार गेला तर, त्याचा फायदा दुसऱ्या संघाला होतो. मात्र जर, फलंदाजानं थ्रो करण्याआधी धाव पूर्ण केली नसेल तर, एक अतिरिक्त धाव फलंदाजाला मिळत नाही. त्यामुळं जेव्हा गुप्टिलनं थ्रो केला तेव्हा बेन स्टोक्स क्रिजमध्ये नव्हता. त्यामुळं दोन रन ऐवजी केवळ एक धाव देणे गरजेचे होते. त्यामुळं पंचाच्या एका चूकीमुळं न्यूझीलंडला वर्ल्ड कप गमवावा लागला.
भाविकांच्या देणगीवर कोण मारतंय डल्ला, पाहा SPECIAL REPORT