वडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप!

इंग्लंडचा संपूर्ण संघ मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध खेळत होता पण बेन स्टोक्स मात्र त्याच्या जन्मभूमीविरुद्धच लढत होता.

  • Share this:

क्रिकेटच नव्हे तर इतर अनेक खेळात असे खेळाडू बघायला मिळतात ज्यांचा जन्म एका देशात झाला आणि दुसऱ्याच देशाकडून खेळतात. ही गोष्ट काही नवीन नाही. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात वर्ल्ड कपसाठी अंतिम सामन्यात बेन स्टोक्स इंग्लंडकडून खेळत होता तर त्याचे वडील न्यूझीलंडला सपोर्ट करत होते. यामागे कारणही तसंच आहे.

वर्ल्ड कपच्या सुपर फायनलमध्ये बेन स्टोक्सनं महत्त्वाची भूमिका पार पाडली. इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकारही तोच ठरला. बेन स्टोक्सलाच अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

इंग्लंडचा संपूर्ण संघ मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध खेळत होता पण बेन स्टोक्स मात्र त्याच्या जन्मभूमीविरुद्धच लढला. स्टोक्सचा जन्म 4 जून 1991 मध्ये न्यूझीलंडमधील ख्राइस्टरचर्चमध्ये झाला.

बेन स्टोक्सचे वडील रग्बी प्रशिक्षक होते. बेन ज्यावेळी 12 वर्षांचा होता तेव्हा त्याच्या वडीलांची नियुक्ती इंग्लंडमध्ये वर्किंग्टन टाउन रग्बीच्या प्रशिक्षकपदी झाली. त्यावेळी त्यांना इंग्लंडला स्थलांतर करावे लागले. इंग्लंडला आल्यानंतर बेन स्टोक्सनं क्रिकेट शिकायला सुरुवात केली. स्टोक्स सध्या इंग्लंडमध्येच असला तरी त्याच्या आई वडिल 2013 पासून न्यूझीलंडमध्येच राहत आहेत.

बेन स्टोक्स इकडं मैदानावर इंग्लंडविरुद्ध लढत असताना वडील मात्र न्यूझीलंडला सपोर्ट करत होते. न्यूझीलंडच्या पराभवामुळं दुख: झाल्याचंही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 15, 2019 06:14 PM IST

ताज्या बातम्या