LIVE NOW

IND vs ENG : भारताचा पहिला पराभव, इंग्लंडचा 31 धावांनी विजय

इंग्लंडने दिलेल्या 338 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी 138 धावांची भागिदारी केली.

Lokmat.news18.com | June 30, 2019, 11:22 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated June 30, 2019
auto-refresh

Highlights

Load More
बर्मिंगहॅम, 30 जून: ICC Cricket World Cupमध्ये भारताच्या विजयरथाला ब्रेक लावत इंग्लंडने सेमीफायनलच्या आशा जिवंत ठेवल्या. भारताने 50 षटकांत 306 धावा केल्या. इंग्लंडने 31 धावांनी विजय मिळवला. इंग्लंडनं प्रथम फलंदाजी करताना भारताला 338 धावांचे आव्हान दिले. मात्र दुसऱ्याच ओव्हरमध्ये वोक्सनं भारताला मोठा धक्का दिला. सलामीवीर केएल राहुल एकही धाव न करता बाद झाला. याआधी रोहित शर्मा 4 धावांवर असताना त्याला जीवनदान मिळाले होते. आता रोहित आणि विराट यांनी 138 धावांची भागिदारी केली. विराटने अर्धशतक केलं. तो 66 धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्माने शतक साजरं केलं.त्यानंतर लगेच व्होक्सच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. त्यानंतर वर्ल्ड कपमध्ये पहिला सामना खेळणारा रिषभ पंत 32 धावांवर बाद झाला. त्यानंतर पांड्याही लवकर बाद झाला. याआधी भारतीय गोलंदाजांवर इंग्लंडच्या गोलंदाजांनी आपले वर्चस्व राखले. मात्र, कुलदीप यादवनं भारताला पहिले यश मिळवून दिले. जेसॉन रॉय 66 धावांवर बाद झाला. सलामीला आलेला बेअरस्टो यांन 90 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. त्यामुळं भारतीय गोलंदाजांना बेअरस्टोला बाद करावे लागणार आहे. जेसॉन बाद झाल्यानंतर मैदानात सध्या रूट फलंदाजीसाठी आला आहे. बेअरस्टो 111 धावा करत बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेला इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन यालाही शमीनं माघारी धाडले. मॉर्गन 1 धावा करत बाद झाला. त्यानंतर रूट आणि बेन स्टोक यांनी चौथ्या विकेटसाठी चांगली फलंदाजी केली. मात्र, शमीनं पुन्हा एकदा इंग्लंडला एक झटका दिला, रूट 44 धावांवर बाद झाला. तर, बटलर 20 धावांवर बाद झाला. शमीनं वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा 5 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. बेन स्टोकच्या 79 धावांच्या जोरावर इंग्लंडनं 337 धावांपर्यंत मजल मारली.
corona virus btn
corona virus btn
Loading