लंडन, 14 जुलै : ICC Cricket World Cup स्पर्धेच्या महासंग्रामातील अंतिम सामना आज होत आहे. या सामन्यात न्यूझीलंड आणि इंग्लंड हे संघ आमने सामने आले आहेत. या दोन्ही संघांना आतापर्यंत एकही वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. त्यामुळे हे विजेतेपद त्यांच्यासाठी पहिलंच असेल. साखळी फेरी संपल्यानंतर न्यूझीलंड गुणतक्त्यात चौथ्या तर इंग्लंड तिसऱ्या स्थानी होते. न्यूझीलंडने भारताचा आणि इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा सेमीफायनलमध्ये पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
दरम्यान, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने भारताच्या कामगिरीचे कौतुक करत कोण वर्ल्ड कपमध्ये कोण विजेता होईल ते सांगितलं होते. भारताचा साखळी फेरीत इंग्लंडविरुद्ध सामना होण्यापूर्वी मायकल वॉनने ट्विट केले होते. भारताला साखळी फेरीत 30 जूनला झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर भारताने उर्वरित दोन्ही सामने जिंकले होते.
भारताने साखळी फेरीत 9 पैकी 7 सामने जिंकले आणि एक सामना गमावला तर एक सामना पावसामुळे होऊ शकला नाही. मायकल वॉनने केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं की, भारतीय संघ स्पर्धेत अपराजित आहे. भारताला जो संघ पराभूत करेल तो वर्ल्ड कप जिंकेल.
Will stick to it ... Whoever beats India will WIN the World Cup ... !!! #CWC19
— Michael Vaughan (@MichaelVaughan) June 27, 2019
मायकल वॉनने केलेल्या ट्विटनंतर भारताचा इंग्लंडशी सामना झाला. त्यात भारताचा पराभव झाला. पुढचे सामने जिंकून भारताने सेमीफायनल गाठली मात्र तिथे न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. यामुळं भारताचं आव्हान संपुष्टात आलं. दुसऱीकडे इंग्लंडने सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करून फायनल गाठली.
What a way to spend a Sunday @Eoin16 ... leading England out in a #WorldCupFinal ... 4 yrs of hard work allows you to get out at #Lords and enjoy the day ... Good luck both teams but absolutely no impartiality today ... COME ON ENGLAND #CWC19
— Michael Vaughan (@MichaelVaughan) July 14, 2019
भारताला संपूर्ण स्पर्धेत इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. मायकल वॉनने केलेल्या ट्विटनुसार भारताला पराभूत करणारा संघ विजेता होईल हे त्यांचं म्हणणं खरं ठरेल पण त्यात न्यूझीलंड की इंग्लंड बाजी मारेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण कोणीही जिंकलं तरी मायकल वॉन यांची ती भविष्यवाणी अर्धी खरी आणि अर्धी खोटी ठरेल.
किती चांद्रमोहिमा झाल्या यशस्वी? पाहा हा SPECIAL REPORT