Load More
लॉर्ड्स, 14 जुलै: क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर रंगलेल्या सामन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंड यांचा सामना टाय झाला. दोन्ही संघांनी निर्धारीत षटकात 241 धावा केल्या. अखेरच्या चेंडूवर दोन धावा हव्या असताना इंग्लंडला एकच धाव काढता आली. त्यानंतर इंग्लंडने एका षटकांत 15 धावा काढल्या. न्यूझीलंडला अखेरच्या चेंडूवर दोन धावा काढता आल्या नाहीत.
न्यूझीलंडनं टॉस जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय आहे. मात्र न्यूझीलंडच्या फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नाही. दरम्यान न्यूझीलंडनं दिलेल्या 242 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जेसॉन रॉय 17 धावांवर बाद झाला. हेन्रीनं मिळवून दिले न्यूझीलंडला पहिले यश. त्यानंतर जो रूट स्वस्तात बाद झाला. त्यानंतर जॉनी बेअरस्टो आणि इयॉन मॉर्गन हे लागोपाठ बाद झाले. त्यानंतर जोस बटलर आणि बेन स्टोक्सने डाव सावरला.
परिणामी, मार्टिन गुप्टिल 19 धावांवर बाद झाला. क्रिस वोक्सनं इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर केन विल्यम्सन आणि निकोलस यांनी अर्धशतकी भागिदारी करत न्यूझीलंडला 21 ओव्हरमध्ये शंभरचा आकडा गाठला. त्यानंतर कर्णधार केन 30 धावा करत बाद झाला, प्लेंकेटनं मोक्याच्या क्षणी इंग्लंडला विकेट मिळवून दिली. फलंदाजीसाठी आलेला रॉस टेलरही 15 धावा करत बाद झाला. न्यूझीलंडच्या अडचणी वाढल्या, प्लंकेटनं पुन्हा एकदा आपल्या जाळ्यात निशामला अडकवले. इंग्लंडकडून प्लंकेट, वोक्सनं 3 तर, जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतल्या. तर, न्यूझीलंडकडून केवळ निकोलसनं अर्धशतकी खेळी केली. वर्ल्ड क्रिकेटच्या इतिहासात 29 वर्षानंतर अशी फायनल होणार आहे ज्यातून क्रिकेटविश्वाला नवा विजेता मिळेल. या दोन्ही संघांनी आतापर्यंत विश्वचषक जिंकलेला नाही. त्यामुळे जो संघ जिंकेल तो इतिहास घडवेल.
