INDvsENG : भारतासमोर फक्त 338 धावाच नाही तर इतिहासाचंही आव्हान!

INDvsENG : भारतासमोर फक्त 338 धावाच नाही तर इतिहासाचंही आव्हान!

ICC Cricket World Cup भारताचा वर्ल्ड कपमधील इतिहास पाहता 338 धावांचं आव्हान पेलणार का असा प्रश्न निर्माण होत आहे.

  • Share this:

बर्मिंगहम, 30 जून : ICC Cricket World Cup 2019 मध्ये इंग्लंडनं प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 338 धावांचं आव्हान ठेवलं आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या इंग्लंडला भारतानं 50 षटकांत 7 बाद 337 धावांवर रोखलं. यानंतर भारताला हे आव्हान पेलणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे. 338 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर केएल राहुल शून्यावर बाद झाला. सध्या रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळत आहेत. पण भारताचा वर्ल्ड कपमधील इतिहास असं सांगतो की, आतापर्यंत भारताने एकदाही 300 पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग केलेला नाही. त्यामुळे बर्मिंगहमवर भारत सामना जिंकून इतिहास बदलणार का याची उत्सुकता लागून राहिली आहे.

वर्ल्ड कपमध्ये भारत हा एकमेव अपराजित संघ आहे. सहापैकी 5 सामने भारताने जिंकले असून एक सामना पावसामुळे रद्द झाला. इंग्लंडविरुद्धचा सामना ज्या मैदानावर झाला आहे तिथं शेवटच्या षटकापर्यंत सामन्याचा निकाल लागत नाही. दोन्ही डावात खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाजांसाठी मदत करते.

भारत आणि इंग्लंडच्या सामन्याआधी बर्मिंगहममध्ये दोन सामने झाले आहेत. यामध्ये पाठलाग करणाऱे संघ जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेला न्यूझीलंडनं तर न्यूझीलंडला पाकिस्ताननं पराभूत केलं आहे. दोन्हीवेळा सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला होता. या मैदानावर गेल्या 10 सामन्यात दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ 5 वेळा जिंकला आहे तर 4 वेळा पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. भारताने 2014 मध्ये याच मैदानावर इंग्लंडला पराभूत केलं होतं.

2017 च्या चॅम्पियन ट्रॉफीत भारताला पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. तेव्हा पाकिस्तानने 338 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारताला फक्त 158 धावा करता आल्या होत्या.

2011 च्या वर्ल्ड कपमध्ये साखळी फेरीत इंग्लडं आणि भारत यांच्यात सामना झाला होता. यात इंग्लंडने भारताला 49.5 षटकांत 338 धावांत गुंडाळलं होतं. त्यानंतर फलंदाजी करताना इंग्लंडला 50 षटकांत 8 बाद 338 धावांपर्यंत मजल मारता आली होती. हा सामना अनिर्णित राहिला होता.

मधल्या फळीची चिंता

भारत सध्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. याचं कारण फलंदाजीत आघाडीची फळी आणि गोलंदाजी आहे. भारताचे आघाडीचे तीन फलंदाज रोहित शर्मा, विराट आणि धवन मोठी खेळी करतात तेव्हा मोठं आव्हान उभा करता येतं. तर जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव यांच्या माऱ्यासमोर धावा करणं प्रतिस्पर्धी संघाला कठीण होतं. गेल्या दोन वर्षांत भारताने मिळवलेल्या विजयात हेच मोठं कारण आहे. दरम्यन भारतासमोर मधल्या फळीत खेळणाऱ्या फलंदाजांचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. अनेकदा मोक्याच्या क्षणी मधली फळी ढेपाळलेली दिसली आहे. भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज धोनीचा फॉर्म पूर्वीसारखा राहिला नाही. अफगाणिस्तानविरुद्ध त्याने 52 चेंडूत 28 धावा केल्या होत्या. तर वेस्ट इंडिजविरुद्ध 59 चेंडूत अर्धशतक साजरं केलं.

चौथ्या क्रमांकाचा पेच कायम

वर्ल्ड कपमध्ये 5 सामन्यात भारताने चार नंबरवर तीन फलंदाज खेळवले. यात ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुद्ध हार्दिक पांड्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. पांड्या नेहमी सातव्या क्रमांकावर फलंदाजी करतो पण सामन्यातील परिस्थिती पाहून त्याला बढती दिली गेली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात केएल राहुलला संधी देण्यात आली होती. चौथ्या क्रमांकासाठी तोच योग्य पर्याय होता. मात्र, शिखर धवन स्पर्धेला मुकल्यानं त्याला सलामीला उतरावं लागत आहे. त्यामुळे अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज विरुद्ध विजय शंकर चौथ्या क्रमांकावर उतरला. त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. इंग्लंडविरुद्ध पंतला संघात स्थान दिले असून चौथ्या क्रमांकावर तो खेळण्याची शक्यता आहे. भारताचे आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर धावगतीचा वेगही मंदावतो. त्यामुळे भारताची मधल्या फळीतील फलंदाजी डोकेदुखी ठरत आहे.

VIDEO: कंडक्टर मुलीला आंटी म्हणाला आणि बसमध्ये झाला राडा

First published: June 30, 2019, 8:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading