LIVE NOW

World Cup ENG vs AUS Live Score : गतविजेत्यांचा पराभव, इंग्लंडची फायनलमध्ये धडक

आतापर्यंत ऑस्ट्रेलियानं सेमीफायनलमध्ये एकही सामना त्यांनी गमावलेला नाही. तर इंग्लंड 1992नंतर पहिल्यांदा सेमीफायनलमध्ये उतरली आहे.

Lokmat.news18.com | July 11, 2019, 9:53 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated July 11, 2019
auto-refresh

Highlights

बर्मिंगहॅम, 11 जुलै : ICC Cricket World Cup ऑस्ट्रेलियानं दिलेलं 224 धावांचं आव्हान इंग्लंडने 32.1 षटकांत 2 गड्यांच्या मोबदल्यात पार करून सेमीफायनलमध्ये विजय मिळवला. या विजयासह यजमान इंग्लंडने फायनलला धडक मारली असून यंदा क्रिकेट जगताला नवा जग्गजेता मिळणार आहे. इंग्लंडच्या सलामीवीरांनी 124 धावांची भागिदारी करून भक्कम सुरूवात केली. जेसन रॉयनं 85 धावा करून महत्त्वाची भूमिका पार पाडली. तर जॉनी बेअरस्टोनं दुसऱ्या बाजुने सावध खेळी करत त्याला साथ दिली. बेअरस्टो स्टार्कच्या गोलंदाजीवर पायचित झाला. त्यानंतर जो रूट आणि कर्णधार इयॉन मॉर्गन यांनी इंग्लंडला विजय मिळवून दिला. साखळी फेरीत बलाढ्य ठरलेले संघ सेमीफायनलमधून बाहेर पडले. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांनी पहिल्या चेंडूपासून ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर दबाव टाकला. ऑस्ट्रेलियाला केवळ 223 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळंच प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या वॉर्नर आणि फिंचला मोठा फटका बसला. जोफ्रा आर्चरवर दुसऱ्याच ओव्हरवर फिंच शुन्यावर बाद झाला. तर, वॉर्नर 10 धावांवर बाद झाला. तर, सहाव्या ओव्हरमध्येच पीटर हैंड्सकॉम्ब बाद झाला, त्यामुळं ऑस्ट्रेलियाला तिसरा झटका बसला आहे. स्मिथ आणि कॅरी यांच्या शतकी भागिदारीनंतर कॅरी 46 धावांवर बाद झाला. स्मिथ आणि मॅक्सवेल यांची भागिदारी चांगली सुरु असताना, जोफ्रा आर्चरनं मॅक्सवेलला 22 धावांवर बाद केले. त्यानंतर मॅक्सवेल 22 धावांवर बाद झाला. तर, पॅट क्युमिन्सला केवळ 6 धावा करत आल्या. स्मिथ आणि स्टार्क यांनी अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर दोन्ही फलंदाज एकाच षटकात बाद झाला. स्मिथ 85 धावा करत तर, स्टार्क 26 धावा करत बाद झाला.
Load More