World Cup : विजयाची हॅट्ट्रिक! अफगाणिस्तानला हरवून यजमानांची अव्वल स्थानी झेप

ICC Cricket World Cup : इंग्लंडने दिलेल्या 398 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला 50 षटकात 8 बाद 248 धावांपर्यंत मजल मारता आली.

News18 Lokmat | Updated On: Jun 18, 2019 10:43 PM IST

World Cup : विजयाची हॅट्ट्रिक! अफगाणिस्तानला हरवून यजमानांची अव्वल स्थानी झेप

मँचेस्टर, 18 जून: ICC Cricket World Cup स्पर्धेत इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनच्या वादळी खेळीने अफगाणिस्तानसमोर 398 धावांचे आव्हान उभे केले. इंग्लंडने दिलेल्या 398 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला 50 षटकात 8 बाद 248 धावांपर्यंत मजल मारता आली. हा सामना 150 धावांनी जिंकून इंग्लंडने गुणतक्त्यात पहिल्या स्थानी झेप घेतली. अफागाणिस्तानच्या हशमतुल्लाह शाहिदीने सर्वाधिक 76 धावा करून झुंज देण्याचा प्रयत्न केला. इंग्लंडच्या आदील राशिद, जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड यांच्या माऱ्यासमोर त्यांना फार काळ टिकाव धरता आला नाही.

इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या अफगाणिस्तानला जोफ्रा आर्चरने पहिला दणका दिला. दुसऱ्याच षटकात नूर अली झारदनला आर्चरने बाद केलं. शाहिदीशिवाय रहमत शाहने 46 तर असगर अफगाणने 44 धावा केल्या. कर्णधार गुलबदीन नैब 37 धावा करून बाद झाला. इतर फलंदाजांना फारशा धावा करता आल्या नाहीत.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना जेम्स विन्स अवघ्या 26 धावा करून बाद झाला.त्यानंतर जॉनी बेअरस्टोनं 90 धावा केल्या. इंग्लंडच्या 30 षटकांत 2 बाद 164 धावा झाल्या होत्या. त्यानंतर जो रूट आणि इयॉन मॉर्गन यांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली. मॉर्गनने तर चक्क 71 चेंडूत 148 धावा केल्या. यात 4 चौकार आणि 17 षटकारांचा समावेश होता. मोहम्मद नैबने ही जौडी फोडली. नैबने रूटला रहमतकरवी झेलबाद केलं. रूटने 88 धावा केल्या. त्यानंतर पुढच्या चेंडूवर मॉर्गनने एक षटकार मारला आणि नैबच्याच गोलंदाजीवर रहमतच्या हाती झेल देऊन तो बाद झाला.Loading...

हेड-टू-हेड

इंग्लंड-अफगाणिस्तान केवळ एकवेळा आमने सामने आले आहेत. यात इंग्लंडनं विजय मिळवला आहे. वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडनं अफगाणिस्तानविरुद्ध 101 तर अफगाणिस्ताननं इंग्लंडविरुद्ध 11 धावा केल्या आहेत. ही त्यांची सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे.

वाचा- सानियानं काढला 'ती'च्यावर राग म्हणाली, 'मी पाकिस्तान संघाची आई नाही'

वाचा-World Cup : इंग्लंडची चिंता वाढली, ऐन वर्ल्ड कपमध्ये बदलावा लागणार कर्णधार

वाचा- World Cup : ठरलं ! 'या' चार संघांना मिळणार सेमीफायनलचे तिकीट


लाजा धरा लाजा, पाकच्या आजीनी सर्फराजला झापलं, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 18, 2019 02:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...