World Cup जिंकल्यानंतर मॉर्गनचा मोठा खुलासा, सामन्याच्या निकालावर केलं 'हे' वक्तव्य

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्यात सुपर ओव्हर टाय झाल्यावर नियमानुसार इंग्लंडने विजेतेपद पटकावले. त्यानंतर आयसीसीच्या नियमांवर टीकाही करण्यात आली.

News18 Lokmat | Updated On: Jul 20, 2019 02:34 PM IST

World Cup जिंकल्यानंतर मॉर्गनचा मोठा खुलासा, सामन्याच्या निकालावर केलं 'हे' वक्तव्य

लंडन, 20 जुलै : ICC Cricket World Cup मध्ये अंतिम सामन्यात सुपर ओव्हरचा थरार रंगला. अखेर त्यातही टाय झाल्यावर चौकार षटकाराच्या जोरावर इंग्लंडने बाजी मारली. मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने पहिला वर्ल्ड कप जिंकला असला तरी त्याला वादाची किनार आहे. अंतिम सामन्यात ओव्हर थ्रोचा वाद सध्या चर्चेचा विषय आहे. या ओव्हर थ्रोनं न्यूझीलंडचा पराभव केला. नियमानुसार पाच धावा असताना पंचांनी सहा धावा दिल्यानं सामना टाय झाला.

वर्ल्ड कपच्या या निकालानंतर अनेकांनी आयसीसीच्या नियमांवर कठोर शब्दांत टीका केली आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने ही वाईट स्थिती असल्याचं म्हटलं. आता इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने मोठं वक्तव्य केलं आहे.

इंग्लंडला पहिलं विजेतेपद पटकावून देण्याचा मान मॉर्गनला मिळाला. अंतिम सामन्याबद्दल बोलताना मॉर्गन म्हणाला की, मला नाही वाटत की सामन्यातील एक असा क्षण सांगता येईल ज्यामुळे विजय मिळाला. सामन्याचा असा निकाल यावा हे योग्य नाही. विजयामुळे हे सर्व सोपं वाटत असलं तरी पराभवाने हे समजून घेणं कठीण आहे. सामन्यात एकदाही विजेतेपद सहज मिळेल असं वाटलं नव्हतं असंही मॉर्गन म्हणाला.

'वर्ल्ड कप भारताला मिळायला हवा', हे मजेशीर कारण वाचलंत का?

अंतिम सामन्यात कधी इंग्लंड तर कधी न्यूझीलंडचे पारडे जड झाले. गेल्या काही दिवसांत केन विल्यम्सनशी अनेकदा बोलणं झालं. आम्हा दोघांनाही एकमेकांना स्पष्टीकरण देण्याची गरज नाही असं मॉर्गन म्हणाला. मॉर्गनने यावेळी वर्ल्ड कपचा अंतिम सामना जबरदस्त होता असंही म्हणाला.

Loading...

क्रिकेटमध्ये यापेक्षा वाईट काळ असू शकत नाही, दोन खेळाडूंनी घेतली निवृत्ती

धोनीबद्दल मोठी बातमी! वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार नाही

VIDEO: सपाच्या माजी आमदाराच्या घरावर अंदाधुंद गोळीबार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 20, 2019 02:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...