विराटची 'कसोटी', रोहित शर्माकडे भारतीय संघाचे नेतृत्व?

विराटची 'कसोटी', रोहित शर्माकडे भारतीय संघाचे नेतृत्व?

World Cup पराभवानंतर भारतीय संघात फूट पडल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर विराटऐवजी रोहित शर्माकडे नेतृत्व द्यावी अशीही मागणी होत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 जुलै : ICC Cricket World Cup 2019 च्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय संघात बदल केले जाण्याची शक्यता आहे. बीसीसीआय आता दोन कर्णधार करण्याच्या विचारात असल्याचं समजते. मीडिया रिपोर्टनुसार रोहित शर्माकडे एकदिवसीय आणि टी20 तर विराट कोहलीकडे कसोटीचे नेतृत्व सोपवले जाईल. याबाबत आएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना बीसीसीआय़च्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेपूर्वी यावर चर्चा होणार आहे. रोहितकडे एकदिवसीय क्रिकेटचे आणि विराटकडे कसोटीचे नेतृत्व द्यावं का याचा विचार केला जाईल.

आयएएनएसमध्ये आलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, रोहित शर्मा मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व सांभाळण्याची हीच योग्य वेळ आहे. पुढच्या वर्ल्ड कपचे नियोजन करण्याच्या दृष्टीने आता नवीन विचार केला पाहिजे. रोहित नेतृत्वासाठी योग्य पर्याय असेल असंही त्यांनी म्हटलं आहे.

वडिलांचा न्यूझीलंडला पाठिंबा तर मुलानं इंग्लंडला जिंकून दिला वर्ल्ड कप!

वर्ल्ड कपनंतर विराट आणि रोहित यांच्यात दुरावा आल्याच्या बातम्यांचा मुद्दा सर्वात मोठा असेल. प्रशासकांच्या समितीसोबत प्रशिक्षक रवी शास्त्री, कर्णधार विराट कोहली आणि मुख्य निवड अधिकारी एम एस के प्रसाद यांची बैठक होणार आहे. त्यावेळी सर्व मुद्द्यांवर चर्चा होईल असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

ICC च्या संघात विराट-धोनीला संधी नाही, निवडले हे 11 खेळाडू

बीसीसीआय़च्या अधिकाऱ्याने सांगितलं की, तुम्हाला माहिती आहे की प्रशासक समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी संघाच्या कामगिरीची समीक्षा केली जाईल असं आधीच म्हटलं आहे. त्यावेळी संघाबाबत पसरलेल्या अफवा आणि त्यांचे मूळ शोधण्याची गरज आहे. याशिवाय इतर मुद्दे ज्यावर लगेच निर्णय घेणं गरजेचं असेल त्यावर चर्चा होईल.

VIDEO : मुंबईचे महापौर पुन्हा चर्चेत, मोडला पार्किंगचा नियम

First published: July 15, 2019, 11:47 PM IST

ताज्या बातम्या