AUS vs ENG : आर्चरच्या चेंडूनं फलंदाज रक्तबंबाळ, देशासाठी प्राण धोक्यात घालून मैदानात!

ICC Cricket World Cup : जोफ्रा आर्चरचा चेंडू इतक्या वेगाने आदळला की अॅलेक्स कॅरीचे हेल्मेट उडून पडले. त्याला जखम झाली तरीही पट्टी बांधून तो खेळत राहिला.

  • Share this:

ICC Cricket World Cup मधील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये गतविजेत्या ऑस्ट्रेलिया आणि यजमान इंग्लंड यांच्यात सामना सुरू आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.  इंग्लंडच्या वेगवान माऱ्यासमोर 6.1 षटकांत त्यांची अवस्था 3 बाद 14 अशी झाली. कर्णधार फिंच खातेही न उघडता बाद झाला. त्यानंतर वॉर्नर आणि हँडस्कॉम्ब लागोपाठ बाद झाले. त्यानंतर अॅलेक्स कॅरी आणि स्टीव्हन स्मिथ यांनी डावाची सूत्रे हाती घेतली.

दरम्यान सामन्याच्या 8 व्या षटकातं जोफ्राचा उसळता चेंडू अॅलेक्स कॅरीच्या हेल्मेटवर आदळला. यामुळे कॅरी जखमीसुद्धा झाला. अॅलेक्स कॅरीला चेंडू लागल्याचं दिसताच स्मिथसह इंग्लंडचे खेळाडूसुद्धा मदतीसाठी पुढे आले. त्यानंतर कॅरीच्या जखमेवर मलमपट्टी केली तरीही त्यातून रक्तस्राव सुरू होता.

आठव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर जोफ्राचा बाउन्सर थेट अॅलेक्स कॅरीच्या हेल्मेटवर आदळला. हा चेंडू इतक्या वेगाने आदळला की हेल्मेट डोक्यातून उडून पडले. चेंडू हनुवटीला लागल्यानं कॅरीला जखम झाली.

चेंडू लागल्यानंतरही मैदान न सोडता कॅरी खेळत राहिला मात्र पुन्हा 13 व्या षटकानंतर त्यानं पट्टी बांधून घेतली. ऑस्ट्रेलियाचे आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाल्यानं त्याला वरती पाठवलं आहे. स्मिथसोबत मोठी भागिदारी करून डाव सावरण्याची गरज आहे.

याआधी ऑस्ट्रेलियाचा फिल ह्युजेसचा चेंडू लागून मृत्यू झाला होता. कॅरीच्या हनुवटीतून येणारं रक्त पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 11, 2019 05:46 PM IST

ताज्या बातम्या