नवी दिल्ली, 11जुलै: ICC Cricket World Cupमधील सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभव झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघात राजीनाम्याचे सत्र सुरु झाले आहे. बुधवारी मँचेस्टरमध्ये झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने वर्ल्ड कपचा प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाचा 18 धावांनी पराभव केला. भारतीय संघाच्या या पराभवा संघातील खेळाडूंबरोबरच चाहत्यांना देखीलच धक्का बसेल. भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्ठात आल्याच्या दुसऱ्याच दिवशी दोघांनी राजीनामा दिले आहेत.
टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये असलेल्या दोघांनी राजीनामे दिले आहेत. यात संघाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट आणि फिटनेस कोच शंकर बासू यांचा सामेवश आहे. भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या दोन व्यक्तींची सेवा यापुढे मिळणार नाही. भारतीय संघ मैदानात जरी 11 खेळाडूंचा असला तरी त्यामागे मेहनत घेणारे अनेक जण असतात. खेळाडूचे फिटनेस हा मैदानातील कामगिरीसाठीचा महत्त्वाचा भाग असतो. भारताचे वर्ल्ड कपमधील आव्हान सेमीफायनलमध्ये संपल्यानंतर फरहार्ट आणि बासू यांनी राजीनामे दिले आहेत.
World Cup : पराभवानंतर धोनीला केन विल्यम्सननं दिली ही ऑफर, पाहा VIDEO
फरहार्ट यांचा करार वर्ल्ड कपपर्यंतच होता. यासंदर्भात इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयने या दोघांना करार पुन्हा वाढवून दिला होता. पण दोघांनीही तो वाढवून घेण्यास नकार दिला. भारतीय संघासोबतचा माझा आज शेवटचा दिवस होता. मला जशी कामगिरी हवी होती तशी कामगिरी करू शकलो नाही. भारतीय संघासोबत गेली 4 वर्ष काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी बीसीसीआयचे आभार मानतो. भारतीय संघाला आणि त्याच्या सपोर्ट स्टाफला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असे फरहार्ट यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
राजीनामा देणाऱ्या बासू यांनी भारतीय क्रिकेटपटूंसाठी यो-यो टेस्ट पास करणे बंधनकारक केले होते. अर्थात बासू यांचे काम हे पडद्यामागचे होते. कर्णधार विराट कोहलीने त्याच्या फिटनेसचे श्रेय बासू यांनाच दिले होते. बासू हे आयपीएलमधील विराट नेतृत्व करत असलेल्या बंगळुरू संघाचा भाग आहेत.
VIDEO: कट्टर शत्रू असलेल्या साप-मुंगसाच्या लढाईचा थरार कॅमेऱ्यात कैद